प्रतिनिधि सैय्यद जहीर
Pikvima :गेल्या अनेक दिवसापासून पिक विमा मिळवून दिल्याचा श्रेय प्रत्येक नेते मंडळी घेत असतात पण पिक विम्याबद्दल या सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोणीच बोलायला तयार नव्हते त्यावेळेस शेतकरी डासाडासा रडत होते.
पण शेतकऱ्याच्या मदतीला या मतदारसंघात एकही नेता समोर आला नाही म्हणून शेतकरी दिनांक १०डिसेंबर ते १५ डिसेंबर पहिलं उपोषण शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा समितीच्या वतीने श्री बालाजी सोसे यांनी सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर ६ दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले.
उपोषण सोड त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या आश्वासनाने उपोषण सोडले, दुसरे उपोषण शेतकरी योद्धा श्री गजानन जायभाये गोंदणखेड तालुका देऊळगाव राजा गोंदणखेड गावी चार दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले.
त्यांचे उपोषण सोडते वेळेस जिल्हा कृषी अधीक्षक व माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडले तिसरे उपोषण पाडळी शिंदे तालुका देऊळगाव राजा प्रकाश शिंदे व यांची सहकारी यांनी तीन दिवस अन्नत्याग आमरण उपोषण पाण्याच्या टाकीवर केले होते.
चौथा उपोषण परत दुसऱ्यांदा श्री बालाजी सोसे पळसखेड चक्का गावी ४ दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले उपोषण सोडते वेळेस जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडले पाचवं उपोषण श्री रविकांत भाऊ तुपकर यांनी सिंदखेड राजा या ठिकाणी चार दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले.
त्यांचे उपोषण सोडते वेळेस महाराष्ट्र सरकारने चर्चेतून मार्ग काढू असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले श्रेय कोणी पण घ्या
राहिलेल्या शेतकऱ्यांचा पिक विमा बद्दल आता कोणीच बोलत नाही मंग याबद्दल आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पिक विमा मिळून दिल्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार नाही असे सोसे यांनी सांगितले या सर्व आंदोलनामध्ये शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा,बळीवंश लोक चळवळ, युवा संघर्ष समिती सिंदखेड राजा ,शेतकरी मित्र सिंदखेड राजा यांच्या सहकार्याने हे सर्व आंदोलन पार पडले आणि
त्याचं फळ जर मिळाले तर सर्व नेते मंडळी पुढे येतात मी केलं, आम्ही केलं ,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्यामुळे झालं आम्ही पाठपुरावा केला मी अमुकला भेटलो मी तमुकला भेटलो म्हणून शेतकऱ्याला पिक विमा मिळाला पण पिक विमा का इतक्या दिवस मिळाला नाही शेतकऱ्यांना का अर्ज नाकारले
याच्याबद्दल नेते मंडळीकडे कुठलीही माहिती नाही फक्त त्यांना सिरीयस घेण्यासाठी ते प्रेस नोट काढून काहीतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करायची हे सर्व नेते मंडळी बुलढाणा जिल्ह्यातील चालू आहे
Pikvima :असं अनेक नेते मंडळी बोलत असतात पण राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत या मतदारसंघांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये पिक विमा बद्दल एकही शब्द बरा- बुरा शब्द कोणी नेते मंडळी बोलत नाही जसे आज बोलत नाही तसे उद्या श्रेय घेण्यासाठी सुद्धा कोणी या मतदारसंघांमध्ये बोलू नये म्हणून शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा मिळून देण्यासाठी जीवाचं रान करणार असल्याची माहिती शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांनी सांगितले