Police Bharti पोलिस भरती प्रक्रियेतील तांत्रीक व्यत्यय थांबवा भरती इच्छुक उमेदवारांचे प्रशासनाला निवेदन

0
141

 

Akola प्रतिनिधि अशोक भाकरे

Akola अकोला, दि २८: महाराष्ट्र शासन जी पोलीस भरती प्रक्रिया घेत आहे त्यामधील तांत्रीक बिघाड दुर करुन तरुण तरुणींचे भविष्य वाचवावे असे आवाहन एका निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाला करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील Police Bharti पोलीस भरती करिता फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून भरती प्रक्रिया ही अनेक वर्षांनी होत असून अनेक उमेदवारांना या भरतीमध्ये फॉर्म भरण्याच्या तयारीत अडचणी येत असून फॉर्म भरण्याकरिता इंटरनेटची साईट वारंवार बंद चालू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म हे वेळेत भरणे शक्य होत नसून अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत तासनंतास इंटरनेटवर बसून रहावे लागत आहे .

याबाबत लोकसेवा करिअर अॅकाडमीने जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सदर गंभीर समस्येबाबत लक्षात आणून दिले व पोलीस भरती फॉर्म ची प्रक्रियेच्या साईटची माहिती घेऊन पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून या फॉर्मची भरण्याची तारीख वाढवून द्यावी अशी लेखी मागणी करण्यात आली यावेळी लोकसेवा करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. डाॅ. गजानन वाकोडेंसह शेकडो फॉर्म भरणारे उमेदवार आणि पालक आवर्जुन उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांमार्फत या मागणीचे निवेदन गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,(gruh rajymantri Mumbai सचिव गृह राज्यमंत्री मंत्रालय मुंबई, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनाही देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here