Home Breaking News Policenews / घरफोडीचा अट्टल गुन्हेगार अटकेत; ₹9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त – शेगाव...

Policenews / घरफोडीचा अट्टल गुन्हेगार अटकेत; ₹9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त – शेगाव शहर पोलिसांची यशस्वी कारवाई

 

इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा

Policenews:शेगाव (जि. बुलढाणा), दि. 2 मे 2025:
शेगाव शहर पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणात अट्टल गुन्हेगाराला अटक करून सुमारे ₹9,86,250/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून टाटा टिगोर गाडी, घरफोडीचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दि. 28 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता शेगाव येथील रहिवासी कमलींग परीहार यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याची तक्रार शेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपी शेख अहेमद शेख समद (वय 36, रा. आरास ले-आऊट, बुलढाणा) व त्याच्या साथीदाराने दुसऱ्या शेजारी देवलाल ढगे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. चोरीनंतर आरोपींनी टाटा टिगोर (MH-48-BH-1205) गाडीने पळ काढला, परंतु गाडी झाडाला आदळल्याने एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

Murdernews/हिंगणघाट येथे दिवसाढवळ्या ६५ वर्षीय इसमाची हत्या

तपासादरम्यान अटक आरोपी शेख अहेमद याने त्याचा फरार साथीदार सैय्यद शकील सैय्यद युसुफ (रा. इकबाल चौक, बुलढाणा) याच्यासह शेगाव परिसरात सात गुन्ह्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

टाटा टिगोर कार (MH-20-EJ-7078)

डुप्लिकेट नंबर प्लेट्स

दोन लोखंडी रॉड

तुटलेली कुलुपे

रोख रक्कम ₹15,000/-

एकूण मुद्देमाल किंमत – ₹9,86,250/-

या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अपर अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल जाधव, पोलीस हवालदार गणेश वाकेकर, गजानन वाघमारे, संतोष गवई, निलेश गाडगे, आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Policenews:आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, त्याच्याकडून इतर गुन्ह्यांबाबत चौकशी सुरु आहे. आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.