प्रशासकीय कामं वेगाने करा -आ. डॉ राजेंद्र शिंगणे लोणार पं. स. च्या बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश ( rajendra shingne )

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

rajendra shingne :लोणार : पंचायत समिती स्तरावर रखडलेले कामे त्वरित मार्गी लावून लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवा असे निर्देश आज लोणार पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सिंदखेडराजा मतदार संघांचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोणार तालुक्यातील जवळपास 24 गावे सिंदखेड राजा मतदार संघात येतात या गावातील सामुदायिक सिंचन विहरी, पांदन रस्ते, सिमेंट रस्ते, तांडा वस्ती सुधार तसेच शाळा दुरुस्तीची बरीच कामे प्रशासकीय पातळीवर गेल्या काही महिन्यात राखडलेली आहेत,

याच कामासंदर्भात आ डॉ राजेंद्र शिंगणे यांनी संबधीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत हि सर्व कामे त्वरित मार्गी लावावे तसेच सर्व सामान्य जनतेपर्यंत शेतकऱ्यांसाठी असलेल्या बकरी शेड, गोठा बांधकाम, कुक्कुट पालन इत्यादी योजना पारदर्शनक पणे राबवाव्यात असे निर्देश पंचायत समिती लोणार च्या सभागृहात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आरपीएफ रंजन तेलंग यांची पुन्हा दमदार कामगिरी दोन मोबाईल चोरटे रंगेहाथ ताब्यात ( rpfnews )

गेल्या काही दिवसा पासून शिंदखेडराजा मतदार संघातील गावातील कामे रेंगाळल्याच्या तक्रारी या भागातील सरपंच तथा कार्यकर्त्यांनी आ डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या कडे केल्या होत्या त्या पार्शवभूमीवर आ डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशानुसार सदर तातडीच्या बैठकीचे आयोजन गटविकास अधिकारी यांनी केले होते,

प्रशासकीय कामं वेगाने करा -आ. डॉ राजेंद्र शिंगणे लोणार पं. स. च्या बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश ( rajendra shingne )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या बैठकीला राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष डॉ भास्कर मापारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू इंगळे, सरपंच बाळू महाजन, मोरे, संदीप गायकवाड, राहुल शिंदे या पदाधीकाऱ्यासह गट विकास अधिकारी देशमुख,

rajendra shingne:अधीक्षक रवींद्र मापारी, सहाय्यक ठोके, अभियंता शेळके, आरोग्य अधिकारी डॉ वैभव मापारी, बालविकास अधिकारी सोने, सह गटविकास अधिकारी रामप्रसाद मुंढे, राठोड यांच्या सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment