यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे
revenuenews:आज शनिवार दि.८ जून २०२४ रोजी सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान जळगाव तालुक्यातील ईदगाव येथील अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर यावल तालुक्यात किनगाव येथे येत असल्याची गुप्त खबर डांभुर्णी किनगाव परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदार सौ.
मोहनमाला नाझीरकर यांच्या महसूल पथकास दिल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात जमा करून पुढील कारवाई सुरू केली.
या कौतुकास्पद झालेल्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीत सुद्धा इतर क्षेत्राप्रमाणे अतिक्रमण होत असल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरात घुसून विनयभंग! वासनांध युवकाला पाच वर्षाची शिक्षा ( crimenews )
याबाबत सविस्तर माहिती अशी की ईदगाव येथील अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर किनगावात येत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार सौ. मोहनमाला
नाझीरकर यांनी व यावल येथील तलाठी ईश्वर कोळी, डोंगर कठोरा येथील वसीम तडवी ,पिंपरुड येथील तलाठी श्वेता ससाणे, , आडगाव येथील राजू गोरटे यांनी तात्काळ किनगाव येथे जाऊन प्रवेश द्वारा जवळ ईदगाव येथील मनोज
बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा
revenuenews:विश्वनाथ कोळी विवेकानंद मधुकर पाटील या दोघांचे अवैध वाळूचे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी जमा केले.