भरधाव दुचाकीची बसला धडक! एक ठार , एक गंभीर.. मोताळा रोडवरील मुर्ति फाट्यानजीकची घटना.(road accident )

0
0

(सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा )

road accident: भरधाव वेगाने जात असलेली दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला धडकली आणि याच धडकेत वैभव गणगे याचा जागीच मृत्यू झाला.

तर दुचाकीवर मागे बसून असलेला त्याचा मित्र राजू बावणे हा गंभीर जखमी आहे. दुपारी २:३० वाजेच्या दरम्यान, मोताळा रोडवरील मूर्ती फाट्यानजीक ही दुर्घटना घडली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

एम. एच ४० ए.एन ९९४१ क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस मेहकर येथून भुसावळला जात होती. त्यावेळी बुलडाणा मलकापूर मार्गावरील मूर्ती फाट्यानजीक एम.एच १९ बि. ए.१२८७ क्रमांक असलेल्या भरधाव दुचाकीने बसला समोरून धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालवणारा वैभव गणगे याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

road accident: मागे बसलेला राजू बावणे याला देखील जबर मार लागला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here