बीबी ग्रामीण रुग्णालयाला आता तरी रक्त, लघवी तपासणी मशीन मिळणार का?खाजगी लॅब वाल्यांची चांदी मात्र गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड) ( rural Hospital )

 

लोणार तालुका प्रतिनिधी. सय्यद जहीर

rural Hospital:ग्रामीण रुग्णालय बीबी हे जालना – मेहकर हायवेवर असून मंत्री महोदयांच्या नेहमी येण्या-जाण्याचा मार्गावर आहे. तरीही बीबी ग्रामीण रुग्णालयाची समस्या अजूनपर्यंत सुटलेली नाही.

बीबी येथे 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी उभारण्यात आलेले असून या ग्रामीण रुग्णालयाला 15 ते 20 गावांना जोडलेले असून या गावांसाठी बीबी हे गाव बाजारपेठ असल्यामुळे बीबी येथे नेहमी लोकांची वर्दळ असते. त्यामुळे गोरगरीब जनतेला आरोग्यासाठी बीबी ग्रामीण रुग्णालयातच यावे लागते. बीबी रुग्णालयातील दररोज सरासरी ओ.पी.डी. 100 ते 150 पर्यंत आहे .मात्र येथील रुग्णालयात एक वर्षापासून नादुरुस्त झालेली रक्त ,लघवी तपासणी मशीन अजून पर्यंत आलेली नाही

.त्यामुळे गोरगरीब जनतेला खाजगी लॅबमधून रक्त, लघवी व इतरही तपासणी करण्याकरता नाहक आर्थिक भुर्दंड शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब लोकांना सहन करावा लागत आहे. या अगोदर अनेकांनी मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री ,आयुक्त उपसंचालक ,जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन उपोषणाचे इशारेही दिलेले आहेत. तरीही जुन्या सरकारला जाग आलेली नाही.

गावाची सोय करण्यासाठी पाण्याची टाकी बांधली अन् तीच कोसळली नशीब जीवित हानी टळली पण दोषींवर कारवाही कधी ( brekingnews )

मात्र आता जिल्ह्यालाच जिल्ह्यातील आरोग्य मंत्री मिळाले आहे. आता तरी ग्रामीण रुग्णालय बीबी येथे नवीन रक्त ,लघवी तपासणी मशीन येईल का अशी आशा बीबीकरांना तसेच रुग्ण, नातेवाईकांना आशा आहे. अन्यथा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही .असेही जनतेतून सूर उमटत आहेत.

प्रतिक्रिया व्ही.एस. नागरे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ बीबी).
आम्ही तात्काळ सी. एच. सरांपर्यंत मशीनची माहिती देऊन नवीन मशीनची मागणी केलेली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परंतु अजून पर्यंत नवीन मशीन आलेली नाही. इंजिनीयरच्या म्हणण्यानुसार मशीनची लाईफ संपलेली आहे.

rural Hospital:तरीही रुग्णालयात दररोज 30 ते 35 गोरगरीब रुग्ण रक्त, लघवी व इतरही तपासणीसाठी येतात. मात्र त्यांना ताबडतोब रिपोर्ट मिळत नसल्यामुळे मनस्ताप सहन करून दुसरे दिवशी रिपोर्ट साठी यावे लागते.

Leave a Comment