Shegaon बस स्थानकावरून ३० वर्षीय विवाहीता मुलासह बेपत्ता

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि.प्र.

शेगांव . तेल्हारा येथील ३० विवाहित महिला पिंपळगाव काळे येथे मावशी कडे जाते कसे म्हणून बेपत्ता झाल्यखची घटना दि.२१/११/२०२३ पूर्वी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की डिगांबर मोहनसा उजवणे वय ३६ वर्ष व्यवसाय मुजरी रा. बंजरंग चौक, जुने शहर, पाण्याचे टाकीजवळ तेल्हारा ता. तेल्हारा जि. अकोला यांनी दि.२१/११/२०२३ रोजी शहर पो.स्टे ला फिर्याद दिली की माझे लग्न सन २०१३ मध्ये रोही गोस्ता ता. मानोरा जि. वाशिम येथील महादेव सुरपवार यांची मुलगी वैशाली हीचे सोबत झाले.

असुन, तिचेपासुन मला दोन मुल क्र १)आम वय ८ वर्ष, क्र २) कृष्णा वय ६ वर्ष असे असुन, मांगिल ८ महीण्यापुर्वी मी व माझी पत्नी वैशाली तसेच लहान मुलगा कृष्णा असे सुरत येथे कामानिमित्य गेलो होतो. तेथे माझे साळु सतिश काळे व साळी सौ. रुपाली काळे यांचे सोबत राहुन काम करत आहे.

दि. १८/११/२०२३ रोजी सकाळी ८ वा. मी माझी पत्नी सौ. वैशाली लहान मुलगा कृष्णा असे दिवाळी व भाउबिज सण साजरा करण्यासाठी गावी जाण्यास निघालो सुरत येथुन निघालो, रात्री ८.३० वा. मी माझी पत्नी सौ. वैशाली लहान मुलगा कृष्णा असे बस स्थानक शेगाव येथे तेल्हारा जाण्यासाठी बस ची वाट पाहत बसलो, बरेच वेळा बस न लागल्याने माझी पत्नी म्हणाली की, मी मुलासह माझे मावशीचे घरी पींपळगाव काळे येथे जाते,

तुम्ही रात्र गजानन महाराज मंदिर भक्त निवास मध्ये थांबा व उदया तुम्ही गावी जा, व मी उदया मुलासह गावी तेल्हारा येथे येते, असे सांगुन बस स्थानक शेगाव येथुन माझे लहान मुलासह निघुन गेली. व मी रात्र गजानन महाराज भक्त निवास येथे थांबलो.

दि. १९/११/२०२३ रोजी मी माझी पत्नी सौ. वैशाली हीचे मोबाइल क्र 8830439743 वर संपर्क केला असता, तिचा मोबाइल बंद होता. नंतर मी गावी तेल्हारा येथे जाउन पाहले असता, माझी पत्नी व मुलगा कृष्णा असे घरी पोहचले नाही. म्हणुन मी व माझा भाउ राजु उजवणे व इतर नातेवाइक यांनी परत शेगाव येथे येउन माझी पत्नी व मुलाचा शोध घेतला, तिचे मोबाइल क्र 8830439743 वर वेळोवेळी संपर्क केला असता, तिचा मोबाइल बंद येत आहे.

तसचे तिचेबाबत तिची मावशी चे घरी, तिचे मोहरी व इतर नातेवाईकांकडे विचारपुस केली असता, ती तिचे व इतर कोणत्याही नातेवाईकांकडे गेली नाही. तसेच तिचेबाबत काहीही माहीती मिळाली नाही. म्हणुन मी माझी पत्नी व मुलगा हरविलेबाबत तक्रार देण्यास आलो आहे. त्याचे शोध व्हावा, करीता तक्रार देत आहे.

https://www.suryamarathinews.com/१४-वर्षांच्या-मुलीचे-मुं/
सौ. वैशाली डिगांबर उजवणे वय ३० वर्ष व्यवसाय मुजरी रंग निमगोरा, उंची ५ फुट, बांधा सडपाळ, लाल रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाउज, पायात काळ्या रंगाची सॅन्डल, उजवे हातावर वैशाली नाव गोंदलेले क्र २ कृष्णा डिगांबर उजवणे वय ६ वर्ष . रंग गोरा उंची 3 फुट, बांधा सडपाळ , अंगात पीवळया रंगाचे टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात निळया रंगाची साधी चप्पल, अशी फिर्याद दिली .याबाबत शहर पोलीसांनी हरविल्याची नोंद कली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे. Shegaon

Leave a Comment