इस्माईल शेख सहअमिन शेख
shegaonnews:-सविस्तर वृत्त असे की दिनांक 30 ऑक्टोबर रोजी शेगाव रेल्वे स्टेशन च्या बुकिंग हॉल मधून झोपेत असलेले यात्री गौरव शेंडे यांचा 80000 रु किमतीचा आयफोन कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला याची माहिती रंजन तेलंग यांना मिळाली तेलंग यांनी लगेच स्टेशनवर जाऊन cctv चेक केले.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
तोपर्यंत मोबाईल चोरटा तेथून पसार झाला पण तेलंग यांनी त्यांच्या सर्व गुप्तहेर यांना सांगून ठेवल्याने चोरटा रेल्वे स्टेशन परिसरात असताना गुप्त माहिती वरून तेलंग यांनी 12 तासाच्या आत त्याला पकडले.
shegaonnews:-व याची माहिती जीआरपी शेगाव चे हेड कॉन्स्टेबल पंचकृष्ण खिराडे यांना दिली व आरोपी प्रमोद सोनोने याला पडकून जीआरपी शेगाव यांच्या ताब्यात दिले, रंजन तेलंग यांनी 80000रु च्या मोबाईल चोरीचा 12 तासात छडा लावल्याने पुन्हा त्यांच्या दमदार कार्यवाही ने आरपीएफ विभागाचे नावलौकिक प्रकाश झोतात आले