Buldhana Political News : बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील गटबाजी समोर आली आहे. आमचे जिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसोबत बसून ओल्या पार्ट्या करत असल्याचा खळबळजनक आरोप जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.#Buldhana
याबाबत पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांच्या विरोधात मुंबईत जाऊन शिवसेना (शिंदे गट) नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे.#nivedan
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यभरातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मात्र, शिवसेना शिंदे गटातही गटबाजी वाढत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सध्या शिंदे गटात सर्वकाही ‘आलबेल’ नसल्याचं समोर आलं आहे.#shantaramdane
थेट जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांना बडतर्फ करण्याची मागणीच जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखासह सहा तालुक्यांतील तालुकाप्रमुख यांनी केली आहे. या सर्वांनी मुंबईत जाऊन मंत्री उदय सामंत यांची भेट घेत ही मागणी केली आहे. या वेळी सामंत यांना देण्यात आलेल्या निवेदनात जिल्हाप्रमुख दाणे पाटील यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.#bjp
जिल्हाप्रमुख हे गटबाजीचे राजकारण करीत असून, शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख यांच्यासोबत जवळीक साधून त्यांच्यासोबत ओल्या पार्ट्याही करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शांताराम दाणे यांना तत्काळ बडतर्फ करावं, अन्यथा आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाचे काम बंद करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
काय म्हटलं नेमकं निवेदनात
सर्व सहा तालुक्यांतील तालुका प्रमुख व उपजिल्हाप्रमुख यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात सध्या जिल्हाप्रमुख यांचा बदल करणे गरजेचे आहे. जिल्हाप्रमुख शांताराम दाणे हे सर्वच तालुक्यामध्ये पक्षबांधणी न करता गटबाजीचे राजकारण करतात.#rajkaran #cmomaharashtra #devendrafadnvis
संघटना बांधणीसाठी विविध प्रकारे अडचणी निर्माण करतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले वसंत भोजने व त्यांच्या सहकाऱ्यांची जवळीक ठेवतात व दिवसासुद्धा त्यांच्यासोबत बसन पार्ट्या करतात. त्यामुळे आपले पक्षातील सर्वसामान्य शाखाप्रमुख ते सर्व पदाधिकारी त्यांच्या या वागणुकीला कंटाळले आहेत.
ते पक्ष संघटनेकडे लक्ष न देता आपल्या पक्षाकडून व प्रत्येक तालुक्यात गटबाजी करतात, दारू पिऊन उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखसारख्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत वाईट भाषेत शिवीगाळ करतात, मारण्याच्या धमक्या देतात.#shindegat
त्यांच्या स्वतःच्या तालुक्यात पक्ष संघटन नसून त्यांच्या त्रासामुळे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख यांना काम करताना अडचणी निर्माण होतात, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
त्यामुळे त्यांना तत्काळ पदावरून बडतर्फ करण्यात यावे, नाहीतर आम्ही सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख ते सर्व माजी पदाधिकारी दाणे पदावर कायम असेपर्यंत पक्षाचे काम बंद करणार आहोत.#shivsena #suryamarathinews #brekingnews