सापांना जीवदान द्या – सर्पमित्र वनिता बोराडे ( Snake)

0
4

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Snake:बाल गणेश मंडळाच्या वतीने किनगाव जटुटु येथे 8 सप्टेंबरला राम मंदिरासमोरील सभागृहामध्ये जगातील पहिल्या महीला सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला,

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच शारदा महाजन, वनिता बोराडे, गायक डी.भास्कर, अजय चौधरी हजर होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल गणेश मंडळाच्या वतीने सर्पमित्रांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर गायक डी.भास्कर यांनी बालकांना कविता म्हणून दाखविल्या तसेच सापाविषयी मार्गदर्शन करून माणसाच्या मनामध्ये सपावीषइ जे गैरसमज आहेत.ते दूर केले, त्यानंतर सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सापाला जीवदान देणे आवश्यक आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असे सांगितले, साप हा माणसाचा शत्रू नसतो शेतकऱ्याचा एक चांगल्या प्रकारचा मित्र आहे.

याबाबत सविस्तर समजावून सांगितले. प्रत्येक साप हा विषारी नसून साप चावल्यानंतर त्वरित सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला, सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून, प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन विनोद सातपुते यांनी केले,

Snake:तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले, या छोट्याशा बालकांनी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे, गावकऱ्यांनी या बाल गणेश मंडळाचे कौतुक केले ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here