Home Breaking News STAR5.LIVE या OTT.प्लॅटफाँर्म करीता गयबान्या बाल्या या वऱ्हाडी बोलीभाषेतील विनोदी वेबसिरीजचे थाटात...

STAR5.LIVE या OTT.प्लॅटफाँर्म करीता गयबान्या बाल्या या वऱ्हाडी बोलीभाषेतील विनोदी वेबसिरीजचे थाटात उद्घाटन संपन्न

270
0

 

आज दिनांक १२/०२/२०२१रोजी अकोला येथे स्टार फाईव्ह डाँट लाईव्ह करीता वऱ्हाडी बोलीभाषेतील विनोदी वेबसिरीज चे थाटात उद्घाटन संपन्न झाले. केवळ मनोरंजनाकरीता या वेबसिरीज ची निर्मिती होत असल्याचे दिग्दर्शक जि.तुषार यांनी स्पष्ट केले. दिवसभर नुसते टेन्शन डोक्यावर घेऊन जगणाऱ्या सामान्य नागरिकांना क्षणभर का होईना हसले तर ताणमुक्त करता येऊ शकते. हसण्यामुळे निरोगी जीवन जगणे सुलभ होते, हे जाणून दिग्दर्शक जि.तुषार ह्यानी या वेबसिरीज ची निर्मिती करत असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. तर तरुण पिढीला योग्य दिशा दिली तर त्यांचे कडून विधायक कार्य करुन घेता येईल आणि त्यासाठी आपण पालकांनी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणे किती जरुरीचे आहे हे संकेत साक्षी फिल्म प्रोडक्शन चे अध्यक्ष तथा या वेबसिरीज चे निर्माते सुभाष गवई यांनी स्पष्ट केले. पुरुष मुख्य कलावंत पियुष वानखडे, म्रुनाली ओहेकर, शोभना ठाकरे,श्रेयस गावंडे,अभिषेक वाहूरवाघ, राहूल सोनोने, स्रुष्टी खरात, शुभम दारोकार,अनिल कुळकर्णी, महावीर तायडे,बाबाराव दंदी,दिलीप गोपनारायण, शरद थोरात, गणेश खंडारे,दिनेश खरात उपस्थित होते. या कलावंताना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचे अभिवचन बाबाराव दंदी महावीर तायडे यांनी दिले. संचालन बी. गोपनारायण यांनी केले.

Previous articleभव्य श्रामणेर शिबिर व धम्मपरिषदे चे तांदुळवाडी येथे आयोजन !
Next articleयावल येथे वर्दळीतील दुकाना समोरील उभी रिक्शा बाजुला करण्यावरून वाद एकाने केले मानेवर चाकुकरीत केले गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here