Talathinews:वानखेड (ता. संग्रामपूर): गेल्या चार-पाच वर्षांपासून मौजे वानखेड भाग 2 सजेकरिता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पद रिक्त असून या पदाचा अतिरिक्त कार्यभार वानखेड भाग 1 चे तलाठी सौरभ लेंभे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या व्यवस्थेमुळे भाग 2 मधील ग्रामस्थांचे कामे रखडत असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाने कायमस्वरूपी तलाठी नेमणुकीची मागणी केली आहे
Agricultural policy :/ राज्यातील शेतकऱ्यांसाठी गट शेतीचे नवे धोरण लवकरच
ग्रामपंचायत वानखेडने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, वानखेड भाग 2 संरक्षित सजेतील १० ते १२ हजार लोकसंख्येसाठी तलाठी नेमणुकीचा अभाव मोठी समस्या ठरत असून नागरिकांना पी.एम. किसान सन्मान योजना, शालेय दाखले, 7/12 उतारे, तसेच इतर शासकीय योजना यांसारख्या कामांसाठी अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांच्या अडचणी वानखेड भाग 2 साठी स्वतंत्र तलाठी नसल्यामुळे ग्रामस्थांना वारंवार वानखेड भाग 1 कार्यालयात जावे लागते, जिथे तलाठी सौरभ लेंभे यांना त्यांच्या भागातील कामांमुळे वेळ देणे अवघड ठरत आहे.
त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले असून, मागील काही वर्षांपासून तलाठी कार्यालय रिक्त आहे.
ग्रामपंचायतने दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नागरिकांच्या या समस्या मांडून तातडीने तलाठी नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे इशारा देण्यात आला आहे.
परिस्थितीची सविस्तर पार्श्वभूमी:
संग्रामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील वानखेड गाव वगळता इतर सर्व सजेकरिता स्वतंत्र तलाठी नियुक्त आहेत.
Talathinews:मात्र वानखेड भाग 2 चा कार्यभार वानखेड भाग 1 कडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे वानखेड भाग 2 येथील ग्रामस्थांचे रोजच्या आवश्यक कामांसाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.