माऊली हॉस्पिटल येथे आठ महिन्याच्या बाळाच्या पोटात असलेले टेनिस बॉल इतक्या मापाचे ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रियेने काढले.. tumor hospital 

0
1

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव येथील माऊली हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टरांनी आठ महिन्याच्या बाळाच्या पोटामध्ये असलेले टेनिस बॉल च्या मापाचे ट्यूमर यशस्वीपणे काढण्याची शस्त्रक्रिया पार पाडली याबाबत माहिती देण्यासाठी आज माऊली हॉस्पिटल येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

माऊली हॉस्पिटलचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये ट्युमरच्या शस्त्रक्रिये बाबत माहिती देताना डॉक्टर अंबरीश खटोड़ यांनी सांगितले की आठ महिन्याच्या बाळा च्या पोटामध्ये दीडशे ग्रॅम वजनाचे टेनिस बॉल इतक्या आकाराची ट्यूमर झाले होते.

अतिशय किचकट अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी संबंधित बाळाचे पालक हे मुंबई पुण्यासारख्या शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले त्यांना जवळपास लाखो रुपयांचा खर्च सांगण्यात आलेला होता.

हेही सविस्तर वाचा

https://www.suryamarathinews.com/manoj-jarange-patil-in-mumbai/

मात्र शासनाच्या आयुष्यमान योजनेअंतर्गत माऊली हॉस्पिटल येथे आठ महिन्याच्या बाळावर शस्त्रीकीय करून सदर ट्युमर काढण्यास यशस्वी ठरलो अशा प्रकारची शस्त्रक्रिया मेडिकल सायन्स मध्ये क्वचितच होत असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली  tumor hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here