[जळगाव (जामोद) येथे गर्दी होवून यात्रेचे स्वरुप.]
Vidhansabha:संग्रामपूर ः- विधानसभेच्या निवडणूक २०२४ करीता दि.२२/आॕक्टोबर पासूनउमेदवारी भरण्यास सुरवात झालेली होती, आज दि.२९ /आॕक्टोबर अखेरचा दिवस असल्याने राजकीय पक्षाचे अधिकृत व अपक्ष इच्छुकांनी ,पदाधिकारी ,कार्यकर्ते ,मतदार जळगाव (जामोद) येथे दाखल झाले .
त्यांनी प्रथम जाहीर सभा घेवून भव्य प्रचार रॕली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दि.२८/पर्यंत ६७ व्यक्तींनी ११० अर्ज घेतले आहेत.त्यामध्ये काही राजकीय पक्षासह १०जणांनी उमेदवारी दाखल केली असून आज दि.२९/रोजी शेवटच्या दिवशी
आज उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांनी दाखल केले नामांकन पत्र.( Vidhansabha)
महाविकास आघाडी कडून काँग्रेस च्या डाॕ.स्वाती वाकेकर,वंचित कडून डाॕ.प्रविण पाटील,मनसे कडून अमित देशमुख ,तसेच इतर इच्छुकांनी अपक्ष आपली शक्ती पणाला लावून जळगाव (जा.) येथे वरवट(बकाल)-जामोद कडे
Vidhansabha:जाणाऱ्या रस्यावरील जिनींग मधील खुल्या प्रांगणात सभा घेवून वाजत गाजत पायी प्रचार रॕली काढून जळगाव (जा.) येथील विधानसभा निवडक कार्यालयात उमेदवारी नामांकन पत्र दाखल केले.ह्यासाठी जळगाव (जा.) मध्ये जिकडे तिकडे तुफान गर्दी दिसून येत आहे. जणूकाही यात्रेचे स्वरुप आले होते.