विशाळगड येथील त्या घटनेच्या दोशिं वर कारवाई करा मुस्लिम समाजाकडून निवेदन सादर.( vishalgadnews )

0
3

 

संग्रामपूर ता. प्र अरशद पठाण

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सोनाळा पो. स्टेशन मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १८ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.

सवीस्तर वृत्त असे की कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गाजापुर येथे अतिक्रमण हटविण्याची च्या नावावर काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजी राजे यांचे नेतृत्वात कोणतीही परवानगी नसताना१४ जुलै रोजी मोर्चा काढला होता.

या मोर्चात दरम्यान गाजापूर गावाचा व विशालगड अतिक्रमण या कोणताही संबंध नसताना गाजापूर गावातील मुस्लिम समाजाचे लोकांवर अत्यंत ह्दय द्रावक हल्ला केला मोर्चा काढण्या अगोदर तेथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रशासनाकडे विनंती केली होती.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष योग्य सुरक्षा पुरविली नाही याचा परिणाम असा झाला की मोर्चामध्ये सहभागी झालेल्या समाज कंटकांनी मुस्लिम समाजाचे लोकांवर हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये मस्जिद दर्गा मोटरसायकल चार चाकी वाहन आणि घरांची तोडफोड केली तसेच लहान मुलांना महिलांना मारहाण सुद्धा करण्यात आली या हिंसाचारात मोर्चात सहभागी सर्व गुंडांना अत्यंत अ मानवी वर्तन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे या घटनेची सकल चौकशी करून छत्रपती संभाजीराजे व त्यांच्या सोबतच्या गाव गूंड्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना त्वरित अटक करून न्यायालयीन प्रक्रिया चालवावी आणि मुस्लिम समाजांच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

vishalgadnews:निवेदनावर जुनेद खान. शे. किस्मत. सुफियान खान. शेख हसीन. शेख तौफिक. शेख बबलू. शेख मुबारक आदी मुस्लिम बांधवांच्या सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here