Home चंद्रपूर WCLकॉलनी दूषित पाण्याची समस्या निघाली : काँग्रेसच्या मागणीला यश

WCLकॉलनी दूषित पाण्याची समस्या निघाली : काँग्रेसच्या मागणीला यश

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : येथील सुभाष नगर, गांधी नगर, व परिसरातील वेकोली वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही नाल्यातून जात होती व फुटलेल्या पाईपलाईन मधून नागरिकांना दूषित व घाणेरडे पाणी प्यावे लागत होते.
यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवून अनेक जीवघेण्या आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत होते.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी नागरिकांसह वेकोलीवर धडक दिली होती.

यात घाणेरड्या पाण्याला घेवुन काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

त्याची दखल घेऊन वेकोलीने तीस लाख रुपयांची पाईपलाईन टेंडर मंजूर केले असून लवकरच त्याचे कार्य शुरू होणार आहे.

आज ऊर्जाग्राम ताडाळी वेकोली कार्यलयात झालेल्या बैठकीत हेच आर हेड बिनेज कुमार यांनी वेकोली संदर्भातील अन्य समस्यां ही तातळीने सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, सचिन कोंडावार, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते