बिआरसी चामोर्शी येथे शाळा पूर्व तयारी अभियान प्रशिक्षण.( gadchirolinews )

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

gadchirolinews :चामोर्शी:-गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने तालुक्यातील सर्व १४ केंद्रातील निवडक शिक्षकांचे एक दिवसीय शाळा पूर्व तयारी अभियान प्रशिक्षण दिनांक १२ एप्रिल रोजी घेण्यात आले.

प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून गटसमन्वयक चांगदेव सोरते हे होते तर प्रमुख पाहुणे विषय साधनव्यक्ती घनश्याम वांढरे,कालिदास डोंगरे,कु वंदना चलाख,कु सरलक्ष्मी यामसनी,संसाधन शिक्षक रवी खेवले,जीवन शेट्टे हे उपस्थित होते.

इयत्ता पहिलीमध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून त्यांना शैक्षणिक सहाय्य करणे, उन्हाळी सुट्टीत मातांच्या मदतीने आठ ते दहा आठवडे कृती पत्रिकेतून अभ्यास करून घेणे,प्रशिक्षणात शाळा केंद्र स्तरावरील प्रशिक्षण आणि शाळा स्तरावरील घ्यावयाच्या मेळाव्याची माहिती देण्यात आली.

समृद्धी महामार्गावर ट्रक व आयशर च्या धडकेमध्ये एक जण जागीच ठार तर तीन जखमी ( road accident )

प्रशिक्षणात मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करने त्यांना सहज होऊ शकेल.अनेक अहवालातून आणि अनुभवातून असे आढळले आहे की,मुलं शाळापूर्व तयारी अभावी इयत्ता पहिलीत येतात आणि त्यांना औपचारिक शिक्षण प्राप्त करतांना अनेक अडचणी येतात.परिणामतः पुढे वाचन-गणिताच्या पायाभूत क्षमता देखील पुर्णपणे विकसित होत नाहीत.

अशी मुलं पुढे जाऊन अभ्यासात मागेच पडतात.म्हणूनच प्रथम संस्था,SCERT,समग्र शिक्षा MPSP, आणि शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन एप्रिल ते जून 2024 या दरम्यान पहिले पाऊल- शालपूर्व तयारी अभियान चालविण्याचे योजिले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरु होत असतांना गावस्तरावर पालक,माता गट, शिक्षक,अंगणवाडी,तरुण स्वयंसवेक,ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने इयत्ता पहिलीत आलेल्या मुलांच्या ‘शाळापूर्व तयारी साठी राज्यव्यापी मोहीम घेण्याचे आखले आहे.

तालुका स्तरीय प्रशिक्षणाला प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक श्रीकांत पावडे यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

gadchirolinews:प्रशिक्षणाचे मार्गदर्शक गट समन्वयक चांगदेव सोरते व विषय साधनव्यक्ती कु सरलक्ष्मी यामसनी हे होते.प्रशिक्षणाला तालुक्यातील २८ शिक्षक उपस्थित होते.

Leave a Comment