यावल प्रतिनिधी विकी वानखेडे
यावल : येथील तालुका शेतकी संघात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला.
येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मंगळवारी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे, शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील, नगरसेवक हेमराज फेगडे, नगरसेवक योगेश चौधरी, चेतन अढळकर,रितेश बारी सह मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शेखर पटेल,सुधीर चौधरी, सुनील गावडे,तेजस यावलकर,प्रमोद वाणी, भरत कोळी,विक्की वानखेडे, गोकुळ तायडे, मिलिंद जंजाळे, फिरोज तडवी, दीपक नेवे, राजू पिंजारी या पत्रकारांचा पुष्प, पेन देऊन शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त सन्मानित केले.
Yavalnews /त्याचप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल व रक्तपेढीच्या डॉ.श्रद्धा उबाळे, डॉ. कृणाल ढोबळे, डॉ.लक्ष्मण पाटील, डॉ. दिनेश भोळे, डॉ.रुपेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील पार पडले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेखर पटेल यांनी केले तर आभार तेजस यावलकर यांनी मानले.-








