केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा स्नेह मिलन कार्यक्रम व पालकमंत्र्यांचा सत्कार संपन्न:

0
322

 

प्रतिनिधी:(जालना)केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,जिल्हाध्यक्ष संतोष दानवे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक अण्णा पांगरकर,प्रतीक भैया दानवे,गोवर्धन कोल्हे साहेब यांनी आयोजित केलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमाला जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम जालना येथे संपन्न झाला.यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून,मा.भास्कर आबा दानवे यांची भेट घेतली व भावी आमदार व्हावे व आपल्या माध्यमातून जालन्याचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी विनंती केली.यासाठी पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर,तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजय डोंगरे,ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय आटोळे,भटके विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष तुकाराम राठोड,राजू राठोड,भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव(शाहीर)राठोड,छबुराव राठोड,लक्ष्मण राठोड,शिवाजी राठोड,पांडुरंग आहेरकर,विष्णू राठोड,अनिल राठोड,सचिन चव्हाण,संजय रंधवे व समस्त भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here