दहिगावतील समाजसेवी संघटना शिवशंभुच्या वतीने गोरगरीब आदिवासी बांधवासोबत दिवाळी केली साजरी

0
622

 

यावल, (प्रतिनिधी )विकी वानखेडे

मागील दोन वर्षापासुन संपूर्ण देश हा करोना विषाणुसंसर्गाच्या महामारी संकटात ओढवला गेला होता मात्र यंदा करोना चा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याने यंदाची दिवाळी ही अनलॉकच्या वातावरणात साजरी करण्यात येत असतांना मागील दोन वर्षामध्ये हातावर काम करून पोट भरणारे नागरीक हे अद्याप ही आर्थिक संकटातुन बाहेर आलेले नाही यंदाची आलेली दिवाळी म्हणजे आनंदाचा,मांगल्याचा सण हा सण साजरा करत असतांना आपण सर्वच आनंदाने साजरा करण्यासाठी आपल्या घरांवर आकर्षक रोषणाई करतात या शिवाय दिवाळी उत्साहाच्या वातावरणात साजरी व्हावी साठी आपल्या कुटुंबा करीता नातेवाईकांसाठी वेगवेगळे आकर्षक वस्त्र , खरेदी करत असतात,याचं अनुषंगाने आज शिवशंभू संघटना आणि शिवस्मारक समितीच्या वतीने एक दिवा माणुसकी ह्या उपक्रमाच्याव्दारे गोरगरीबांची दिवाळी साजरी व्हावी याकरीता आदिवासींच्या पाडा नागदेवी वस्ती येथे जाऊन आदिवासी बांधवाना फराळ,मिठाई,खाऊ फटाके वाटप करून आदिवासी बांधवासोबत आगळया वेगळया पद्धतीने उत्साहाच्या वातावरणार दिवाळी साजरी करण्यात आली.यावेळी शिवशंभू संघटनेच्या युवती जिल्हाध्यक्षा कविता पाटील,दिव्या पाटील, अल्पेश जैन शिवस्मारक समिती जळगांव जिल्हाध्यक्ष,कोमल पाटील शिवस्मारक समिती महाराष्ट्र राज्य सचिव,छोटू भाऊ जगताप,मयूर पाटील,जगदीश गायकवाड,रविंद्र पाटील,हितेश महाजन,सुजित पाटील,आकश जैन,निलेश पाटील,रितेश पाटील,योगेश पाटील आदी नी उपक्रम सहकार्य करून उपक्रम उत्साहात पार पाडला…. ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here