दोन अज्ञात व्यक्तींकडून निलंगा बसवर हल्ला किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
318

डी.एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

निलंगा आगारातील लातूर निलंगा बसवर दोन अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीनंतर दोघेही व्यक्ती फरार झालेले आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरु आहे. मात्र पगारवाढीच्या आश्वासनानंतरही राज्यातील अनेक एसटी कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे विलीनीकरण आणि वेतनाच्या मुद्दावरून ८ नोव्हेंबरपासून संप अद्यापही सुरु आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप इतिहासातील विक्रमी संप असल्याचे म्हटले जातेय. अशातच निलंगा आगरातील सात आणि औसा आगारातील दोन आणि लातूर आगारातील दोन बस चालू आहेत. त्यातच आज दुपारी १ वाजता लातूरहून निलंग्याकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या एम.एच.२० बीएल २०१७ क्रमांकाच्या बसवर निलंगाजवळील जाऊ फाट्यावर अज्ञात दोघानी दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या आहेत.हल्ला करणाऱ्या दोन व्यक्तींनी तोंडाला बांधलेले होते व ते नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकरवर आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.
यावर बसवर हल्ला केल्याने या बसचे अंदाजे १० हजारांचे नुकसान झाले आहे.अशी माहिती आगार प्रमुख बाळासाहेब राठोड यांनी दिली.या प्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here