शेतकऱ्यास दोन दिवसात डिपी उपलब्ध न करुन दिल्यास, प्रहार शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

0
435

 

प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगांव नाशिक

 

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील शेतकरी विलास लाठे यांच्या शेतातील विद्युत डीपीत सूमारे तीन महिन्यांपासून बिघाड झाल्याने बंद झाली.यासंबंधित पाठपुरावा करूनही कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डी पी बसवून देण्यासाठी दखल घेतली नाही . सदर शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणे अशक्य झाल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे.सदर शेतकऱ्यास न्याय मिळण्यासाठी दखल घेणे आवश्यक आहे.सदर शेतकर्‍यास त्वरीत डी पी उपलब्ध न झाल्यास प्रहार शेतकरी संघटनेकडून महावितरण संबंधित कंपनी व ठेकेदारा विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नांदगाव तालूका प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी दिला .यावेळी विलास लाठे, जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे, नितीन गायकवाड, रविकांत भागवत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here