प्रतिनिधी ,सचिन पगारे
नांदगांव नाशिक
दि. २७ रोजी नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा ६४४ वा जयंती उत्सव साजरी करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून हा जयंती उत्सव साजरी करण्यात आला.
समाजातील जाती-पाती,गरीब -श्रीमंती सारखे भेदभाव दूर करून समाजाला मानवतेची शिकवण देणारे महान संत शिरोमणी रोहिदास आहेत.या महान संतास उत्तर भारतात संत रविदास तर आपल्या महाराष्ट्रात त्यांना संत रोहिदास म्हणून ओळखले जाते. शिखांच्या गुरूग्रंथसाहेब या पवित्रग्रंथात संत रोहिदासांचे एकूण ४० पदे आहेत.तसेच या मानवतावादी संताचे विचार अनेक समकालीन संतांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविले.अशा महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे मानवतावादी विचार समाजातील प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करणे काळाची खरी गरज आहे.दि.२७ रोजी तालूक्यातील घाटमाथ्यावरील जातेगांव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून आनंदमयी वातावरणात साजरी करण्यात आली. चर्मकार समाजासह तमाम ग्रामस्थांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.यावेळी नवनियुक्त ग्रामपंचायत उपसरपंच पंढरीनाथ वर्पे,ग्रामपंचायत सदस्या पूजा सोमनाथ जाधव ,माजी सरपंच अशोक जाधव,चर्मकार समाजाचे तालूका सचिव राजेंद्र जोनवाल,उत्सव समितीचे अध्यक्ष विलास जोनवाल,उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले.सदर जयंती उत्सवासाठी शंकर जोनवाल,दिपक जोनवाल, भागीनाथ पवार, प्रकाश जोनवाल, मोहन जोनवाल, कैलास जोनवाल, शिवलाल रमणे, रतन साळुंके,सुनिल जाधव,अनिल जाधव,सोनू जोनवाल, विजय जोनवाल,संतोष जाधव, ज्ञानेश्वर जाधव, किशोर जाधव,बाबूलाल जोनवाल आदींसह तमाम समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.