अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे
आकोट : 06/09/2020. स्थानिक राजे संभाजी ऍकेडमी अवधुत कॉलॉनि येथे,तानाजी मालुसरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अकोट द्वारा कोरोना वीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून,ना.त. राजेश गुरव, psi पाटेखेडे मॅडम,शिवसेना जिल्हा समन्वयीका माया ताई म्हैसने,शिवसेनेचे मनीष दादा कराळे, चित्रपट निर्माते दीपक गोरे,adv संतोष खवले हजर होते.तर कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी जनसेवेचे कार्य अखंड पणे चालू ठेवले अशा कोरोना वीरांचा या वेळी सन्मान करण्यात आला, त्यामध्ये पो,हे,कॉ.हिम्मत दंदी, डॉ.कापसे, डॉ.पारसकर, डॉ प्रमोद येउलकर, आ सेवक संतोष बुध, प्रवीण चापके, निचळ , अशोक टेकाडे, बी.ए.वावरे, आ,सेविका ज्योती सोळंके, पत्रकार कुशल भगत,राहुल कुलट,दीपक रेळे, योगेश लबडे, सरपंच संजय ताडे,विराट प्रतिष्ठानचे विशाल भगत,क्रांती ग्रुपचे अचल बेलसरे,सुरज वर्मा,शिव छत्रपती साम्राज्याचे ऍड.संतोष खवले,यांना सन्मानित करण्यात आले, तर प्रमुख मार्गदर्शक श्री गुरव साहेब माया ताई म्हैसने,psi अनुराधा पाटेखडे, ऍड संतोष खवले यांनी कोरोना पार्श्वभूमीवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजीव खारोडे सर,शुभम सोळंके, प्रथमेश बोडखे,हरीश गावंडे, प्रज्वल कोरडे,तुषार नांदूरकर,यांनी मोलाचे योगदान दिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण बोंद्रे, प्रस्थावीक सुरज बुध तर आभार प्रदर्शन आशिष भटकर यांनी केले,कार्यक्रमाचे शेवटी अजिक्य भारत या वृत्तपत्राचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.