अकोला सिटी कोतवाली पो.स्टेशन मध्ये कार्यरत महिला पोलीस कर्मचारीने केली गळफास घेऊन आत्महत्या

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

अकोला : प्रत्येक व्यक्तीला आयुष्य हे एकदाच मिळते. ज्या मध्ये काही व्यक्ती जिवनाला कंटाळून आत्महत्या करतात. असाच काही प्रकार अकोला येथील सिटी कोतवाली पो.स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या वृषाली दादाराव स्वर्गे वय (३५) यांच्या सोबत घडला. सविस्तर वृत्त अशे कि, सिटी कोतवाली हद्दितील गिता नगर मध्ये राहणारी पोलीस कर्मचारी १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदनच्या कार्यक्रमाला हजर नव्हती. दरम्यान वृषाली ज्या अपार्टमेन्ट मध्ये राहायची त्या अपार्टमेंट शेजारील लोकांना त्या कमर्‍यामधून दुर्गंधी येत होती.

दुर्गंध येत असल्यामुळे शेजार्‍यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा आतुन बंद असल्याने उघडता आला नाही. म्हणून त्यांनी सिटी कोतवाली पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून दरवाजा तोडून कमर्‍याच्या आत प्रवेश केला. या वेळी वृषाली स्वर्गे ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. दरम्यान वृषाली जवळ एक सुसाईट नोट आढळून आली.

त्यामध्ये तिने लिहल आहे कि, पतिचे निधन झाल्यानंतर आयुष्यात आज एकटीच राहिली आहे. त्यात मुल-बाळ सुद्धा नाही. जगाव तर कोणासाठी? त्यामुळे आज माझ्या इच्छेने मि आपल जिवन संपवत आहे. माझ्या मृत्युला कोणालाही जबाबदार समजू नये. हे सर्व काही स्व:ता करीत आहे. अस त्या सुसाईट नोट मध्ये नमुद केल आहे.

पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात श्रवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. तसेच परिसरात व पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment