Home Breaking News अखेर डॉ . अविनाश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश

अखेर डॉ . अविनाश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश

2149
0

अखेर डॉ . अविनाश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश

 

 

 

 

जळगाव जामोदः संजय रामदास भोंगाळे रा . आसलगाव यांची पत्नी के शारदा संजय भोंगाळे हिची डिलेवरी करीत असतांना बाळाची अमानवीयरित्या डिलेव्हरी केल्याकारणाने बाळ मृत पावले . त्यामुळे संजय भोंगाळे यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे डॉ . अविनाश पाटील समाधान हॉस्पीटल जळगाव जामोद यांचे विरुध्द लेखी तक्रार दिली परंतु पो.स्टे.जळगाव जामोद यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संजय भोंगाळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर यांचेकडे रितसर लेखी तक्रार केली त्यांनी सुध्दा त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे संजय भोंगाळे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांचे कडे तक्रार दिली परंतु त्यांनी सुध्दा त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे संजय भोंगाळे यांनी
सामाजिक कार्यकर्ता ऊषा ताई मानकर यांचे सहकार्य ने विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कोर्ट जळगाव जा . येथे डाॕ.अविनाश पाटील यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याकरीता फिर्याद दाखल केली होती . वरील कोर्ट ने डॉ. अविनाश पाटील (समाधान हॉस्पटल) यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला असुन त्यानुसार डॉ . अविनाश पाटील यांचे विरूद भा.दं.वि.चे कलम ३०४ , ३१६ , ३१८ , ३३६ , ३३८ , २ ९ ४ , ५०४ ३५०६ नुसार पो.स्टे.जळगाव जामोद यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत . संजय भोंगाळे यांचे वतीने कोर्टात अॕड.रूपेश विश्वेकर अॅड . प्रविण मनसुटे , अॅड . अभिमन्यु वाघ ( पाटील ) यांनी काम पाहिले

Previous articleमंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन भर पावसात आंदोलन ची सुरवात
Next articleदार उघड उद्धवा दार उघड 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here