Home Breaking News अखेर साखरखेर्डा ते शिंदी रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु !

अखेर साखरखेर्डा ते शिंदी रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु !

296
0

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाचा अशा साखरखेर्डा ते शिंदी रस्ता हा पूर्णपणे उखडून गेला आहे या रस्त्यावरती मोठ-मोठाले खड्डे पडले असून याबाबत सतत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला जागी केली आहे व त्याचाच परिणाम आज दिनांक 12 जानेवारी पासून साखरखेर्डा ते शिंदी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम जि प . विभागाने सुरू केली आहे ‘सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाली असून खड्डे बुजवण्या ऐवजी साखरखेर्डा ते शिंदी व शिंदी ते मेरा बुद्रुक पर्यंत पूर्णपणे नव्याने डांबरी रस्ता करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत .खड्डे बुजवण्यासाठी गिट्टी चा चुर व डांबर गोष्टीचा वापर केला जात असून बुजवलेल्या खडड्यातून गिट्टी बाहेर येणार तर नाही हे महत्त्वाची ठरेल ! पाठपुराव्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले आहे !

Previous articleकोविड शिल्ड लसीकरणासाठी सिंदखेड राजा तालुका सज्ज -तालुका आरोग्य अधिकारी श्री महेंद्र साळवे यांची माहिती !
Next articleहोय ही बातमी खरी आहे “ती”, च्यापासून मला दोन लेकरं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here