Home Breaking News अडगांव बु :”शेत शिवारात कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

अडगांव बु :”शेत शिवारात कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

308
0

 

अडगांव बु प्रतिनिधी: दिपक रेळे

अडगांव शेत शिवारात शेतकऱ्यांच्या पिकावरील किडिंचा योग्य प्रकारे नायनाट कसा करावा या बाबत तेल्हारा कृषी विभागाक्षी शेतकऱ्यांनी संवाद साधला त्याला प्रतिउत्तर म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील ज्ञाश्त्रज्ञ बोलावून पार तालुकया भर कृषीदूत आपल्या बांधावर या प्रमाणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी डॉ सोनाळकर, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोल , डॉ.पि.के.राठोड.शास्त्रज्ञ डॉ पं.दे.कृ.वि.अकोल मिलींद वानखेडे तालुका कृषी अधिकारी तेल्हारा ए.एम.राणे कृषी पर्यवेक्षख हिवरखेड व एस.आर.मुळे कृषी सहाय्यक अडगांव बु यांनी खरीपाच्या सर्व पिकांवर विविध प्रकारचे किडींचा वाढता प्रादुर्भान आहे त्या मुळे शेतकऱ्यांना पिकांवर योग्य किटक नाशकांची फवारणी व उत्पादनात वाढ व्हावी या चांगल्या उद्देशाने डॉ.पं.दे.कृ.वि.च्या शास्त्रज्ञांनी शोतकर्‍यांना माहीती दिली सध्या शेतकऱ्यांच्या हातचे नगदी पिक मुंग. उडीद व सोयाबिन ही पिके गेली पण राहिलेल्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे जसे हायब्रीड ज्वारी पिंकवर कंसात अळयांनी अति प्रमाणात आक्रमण केले ज़्वारी खानार्‍या अळीचा हेलीकोव्हपो प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसुन येत आहे सर्व शेतकर्‍यांनी लांब दांडीच्या पंपानी मागच्या दिशेने निंबोळी अर्क किंवा स्पर्शजनंय किटकनाशकांची फवारणी करावी असे सांगण्यात आले आहे बोंड अळी करीता कामगंध सापळे प्राप्ती शेतात एकरी 6लावावीत व कृषी सल्ला प्रमाणे औषधांची फवारणी करावी. या वेळी शेतकरी माणिकराव घाटे, श्री कृष्ण धुळे, अँड.उमेश रहाटे, गजानन मुंगसे,अजय धाके, मंगेश रेळे, गोपाल निमकडै,दिनेश गिर्‍हे,राम थुटे, सतिश धुळे, इत्यादी शेतकरी प्रामुख्याने हजर होते पण.शेतकर्‍यांच्या मते हायब्रीड पिकांवर फवारणी द्रोनची आवश्यकता आहे तरी कृषी विभागाणे शेतकऱ्यांना फवारणी दोन शासना तफै उपलब्ध करून दयावी अशी शेतकर्‍यांची मागणी आहे

 

Previous articleग्रामीण कुटा नव्या दिशा अंतर्गत गाडेगाव येथे कोविड 19 जनजागृती
Next articleदोन दुचाकींची अमोरासमोर धडक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here