अडगाव बु .३३ के.व्ही . उपकेंद्राला कनिष्ठ अभियंता देणार का

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

 

अडगाव बु ३३ के.व्ही . उपकेंद्र अडगाव बु . ला गेल्या ६ वर्षापासून कनिष्ठ अभियंता नाही . मध्यंतरी फक्त तीन म हिन्याकरीता कनिष्ठ अभियंता आला होता . त्यांनी पण तीन महिन्यात आपला गाशा गुंडाळला . या उपकेंद्राचा कारभार कधी तेल्हारा तर कधी हिवरखेड येथून प्रभारी म्हणून सुरू आहे . पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा कधी रात्रभर तर कधी दिवसाला ११ तास विद्युत पुरवठा खंडीत असतो . दिवसाला कित्येक वेळा विद्युत ये – जा करीत असते . विद्युत ब्रेक डाऊन तर कधी दुरुस्तीच्या नावावर बंद असतो . सकाळी १० वाजता गेलेली लाईन रात्री ९ वाजता येते . असा प्रत्येक आठवड्याचा नित्याचाच दिवस ठरला आहे . यामुळे विद्युत ग्राहकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे . हाच प्रकार नेहमीच सुरू राहिल्यास विद्युत ग्राहक उपकेंद्रा समोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत . ज्यांच्याकडे उपकेंद्राचा प्रभार आहे तेही पाहिजे तेवढे लक्ष द्यायला तयार नाहीत . उपकेंद्राचा कारभार पर्वत रांगेपर्यंत चालत आहे . वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेल्या सहा वर्षापासून निवेदने दिली . आ.भारसाकळे यांनाही , कनिष्ठ अभियंता देण्यात यावा ह्याबाबत निवेदन दिले पण काहीही फरक पडला नाही . उलट ग्राहकांना आता मोठ्या प्रमाणात त्रास होण्यास सुरूवात झाली आहे . पावसाळ्याचे दिवस असताना सर्व कृषीपंप बंद आहेत . तरीही विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नाही . गेल्या सहा वर्षात जेवढे सिंगलफेज जळले तेवढ्या पैशात येथे कनिष्ठ अभियंत्याचा पगार निघून वेळोवेळी ग्राहकांना नियमित विद्युत मिळाली असती व लाईनवर आकोडे टाकून घरात लाईन घेण्याचा प्रकार झाला नसता . आताही बऱ्याच मोहल्ल्यात विज चोरीचे प्रमाण वाढले आहे . यावर अजून तरी कोणी नियंत्रण मिळवले नाही . करीता आ.प्रकाश भारसाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करून येथे क.अभियंता व कर्मचारी देण्याची मागणी विद्युत ग्राहक करीत आहेत .

Leave a Comment