अनोळखी महिलांनी स्टेट बँक मध्ये माजी सैनिक असलेल्या खातेदाराच्या कापडी पिशवीतून पन्नास हजार रुपये केले लंपास ..

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

घराच्या बांधकामासाठी स्टेट बँक शाखा शेगाव येथून एक लाख रुपये विड्रॉल करून कापडी पिशवी ठेवल्यानंतर बँक मॅनेजर सोबत चर्चा करीत असताना नजर चुकवून दोघ अनोळखी महिलांनी कापडी पिशवीतून पन्नास हजार रुपये चे बंडल लंपास केल्याची घटना 6 ऑक्टोंबर च्या दुपारी तीन वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी दोन महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील रोकडिया नगर भागात राहणारे माजी सैनिक प्रभुदास अंबादास झाडोकार वय 46 वर्ष यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली

या तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे की प्रभुदास अंबादास झाडोकार माजी सैनिक यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने आज सहा ऑक्टोबर रोजी ते एसबीआय बँक शेगाव येथे एक लाख रुपये खाते क्रमांक 10 88 39 0 5 283 यामधून एक लाख रुपये काढले बँकेत च्या कॅशियरने पाचशे रुपयांच्या नोटेचे पन्नास हजार चे दोन बंडल त्यांना दिले सदर दोन्ही बंडल त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या कापडी थैलीमध्ये ठेवले

ते बँकेचे असिस्टंट मॅनेजर कुठे यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या काउंटर जवळ उभे राहिले त्यावेळेस दोन अज्ञात महिलांनी त्यांची नजर चुकवून थैली मधील पन्नास हजाराचे एक बंडल लंपास केले बँकेच्या बाहेर निघताना झाडोकार यांना त्यांची थैली फाटलेली आढळून आली त्यावेळी त्यांनी थैलीमध्ये पाहिले असता 50 हजाराची एकच बंडल त्यांना दिसून आले त्यांनी याबाबत असिस्टंट मॅनेजर कुठे यांना सांगितले असता बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून पाहिले

असता त्यामध्ये बँकेमध्ये झाडोकार यांच्या जवळ उभे असलेल्या दोन अग्यात महिला वय अंदाजे 35 ते 40 वर्षे यांनी फिर्यादीच्या कापडाची थैली मधून पैसे काढताना दिसून आल्या याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोघा अज्ञात आरोपी महिला विरुद्ध अपराध क्रमांक 530 ऑब्लिक 2023 कलम 379, 34 भावी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वाकीकर बक्कल नंबर 12 44 करीत आहेत

Leave a Comment