अमिताभ बच्चन कुटुंबात आली नवी पाहुनी,,,, कोन आहे है पाहुनी

 

मुंबई : अमिताभ बच्चन साधारण काही महिन्याभरापूर्वीच बच्चन कुटुबीयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर चाहत्यांमध्ये बरंच चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. योग्य वेळी याचं निदान झाल्यामुळं बच्चन कुटुंबीयांनी त्यावरील उपचार घेत कोरोनावर मात केली.

हळूहळू का असेना, पण अखेर हे सेलिब्रिची कुटुंब पुन्हा एकदा रुग्णालयातून घरी परतलं. आता तर बच्चन कुटुंबीयांनी त्यांच्या कामासही सुरुवात केली आहे. कुटुंबातील विविध समारंभांपासून ते अगदी एखाद्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणापर्य़ंत त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
अशा या सेलिब्रिटी कुटुंबामध्ये आता एका नव्या पाहुणीची एंट्री झाली आहे.

 

आता तुम्ही म्हणाल नेमकं या कुटुंबात नव्यानं आलं तरी कोण? छायाचित्रकार आणि नेटकऱ्यांचंही लक्ष वेधणारी बच्च कुटुटंबातील ही नवी पाहुणी म्हणजे त्यांच्या कारच्या ताफ्यातील एक नवं मॉडेल. बिग बींनी नुकतीच मर्सिडीज एस क्लास ही लक्झरी कार खरेदी केली आहे.
नव्या कारची नंबर प्लेट पाहिली असता एक बाब लक्षात येते की त्यावर असणाऱ्या आकड्यांची बेरीज केली असता मिळणारं उत्तर आहे ११. हा आकडा म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची तारीख आणि अर्थातच त्यांचा शुभअंक. बच्चन कुटुंबातील या नव्या कारची किंमत १ कोटी ३८ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर सध्या बच्चन कुटुंबातील याच नव्या पाहुणीची चर्चा सुरु आहे.

Leave a Comment