अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस जळगाव जामोद पोलिसांनी केली अटक…

0
1123

 

जळगांव जा.प्रतिनिधी:-

गजानन सोनटक्के

जळगाव जामोद शहराला लागूनच असलेल्या वाडी खुर्द येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी मोहन तायडे या युवकाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी स्थानिक जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्यावरून त्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी मोहन तायडे याच्याविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता त्यानंतर जळगाव जामोद पोलीसांनी पीडित मुलीसह आरोपीला पकडून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणले आरोपी मोहन तायडे हा पीडित मुलीच्या घरी नेहमी जाणे-येणे करीत होता त्याचे पीडित मुलीच्या घराची चांगले संबंध होते.
त्यातुनच आरोपी मोहन तायडे याने पिडीत मुलीशी अनैतिक संबंध बनविले व तिला आपल्या गाडीवर बसवुन फुस लावुन पळवुन नेले. ज्या ठिकाणी आरोपीने तिला पळवून नेले त्याठिकाणी आरोपी मोहन तायडे यांनी पीडित मुलीसोबत अतिप्रसंग केला यावरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी मोहन तायडे याच्याविरुद्ध कलम 363,376 (2)(आय)(जे)(एन) भारतीय दंड विधान सहकलम 4व6 पोक्सोनुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला तसेच आरोपीला जिल्हा सत्र न्यायालय खामगाव येथे हजर करण्यात आले सदर प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे एपीआय सतीश आडे पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास गव्हाड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here