अल्पवयीन मुलीसोबत जबरजस्ती शारीरिक संबध , गोटूसिंग डाबेराव‌ विरूध्द गुन्हा दाखल

 

अर्जुन कराळे तालुका प्रतिनिधी

शेगांव . लग्नाचे आमिष देऊन एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती बलात्कार प्रकरणी गोटूसिंग गजानन डाबेराव हल्ली मुक्काम रोकडीया नगर शेगाव वय २५ या युवकाविरूध्द शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हकीकत अशा प्रकारे आहे की फी व आरोपी . यांचे मागील चार ते पाच वर्षापासून प्रेम संबंध आहेत नमुद आरोपी फिर्यादीला तुझ्यासोबत लग्न करतो असे आश्वासन देऊन त्याची बहीण घरी नसताना फि ला घेऊन घरी घेऊन गेला व फिर्यादीचे सोबत शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला.

दिनांक १०/१२/ २०२२ रोजी आरोपीने फिर्यादीला मोबाईलवर कॉल करून तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणून शेगाव गौलखेड रोडवरील खदान जवळ घेऊन गेला व त्या ठिकाणी फिर्यादी सोबत शारीरिक संबंध केले दिनांक १२ /१०/ २०२२ रोजी आरोपी याने फिर्यादीला पुन्हा शेगाव येथील गौलखेड रोडवरील खदान जवळ घेऊन गेला व त्या ठिकाणी बोलला की मला माझ्या घरच्यांच्या इच्छेने लग्न करावे लागेल मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही.

व आम्हाला त्रास दिला तर फाशी घेइन अशी आरोपीने फिर्यादीला धमकी दिली कार्यवाही व्हावी फिर्यादी रिपोर्ट वरून आरोपी गोटूसिंग गजानन डाबेराव हल्ली मुक्काम रोकडीया नगर शेगाव याचे विरूध्द अप नं ६३०/२०२२ कलम ३७६,३७६ (२), (एन) ५०६ सह कलम ४ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करन्यात आला असुन घटनेचा पुढील तपास मा पोनीसा आदेशाने सपोनि गौतम इंगळे हे करीत आहेत.

Leave a Comment