आदिवासी बहुउद्देशीय विकास व शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

 

दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी संतोषी माता मंदिर खरांगना मोरांगना, वर्धा येथे आदिवासी विकास व शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या मुख्य कार्यलयचा उद्घाटन समारंभ पार पडला.त्या निमित्ताने संस्थे च्या माध्यमातून आणि माधव नेत्रालय नागपूर याच्या साह्याने निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अंदाजे 600 नागरिकांनी घेतला.
प्रसंगी छ. शिवाजी महाराज,भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती मडावी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव श्री दीपक मडावी म्हणाले या संस्थेच्या माध्यमातून येथील नागरिकांना साठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, इंग्लिश स्पीकीईंग प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार चे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.संस्थेचे नाव आदिवासी विकास व शिक्षण संस्था असले तरी ही संस्था सर्वच समाजासाठी समजतील शोषित,पीडित,वंचितां साठी काम करेल.

अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास नागपूर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात श्री. रवींद्र ठाकरे यांनी “ग्रामीण भागामध्ये कौशल्य आहे, परंतु त्याचा पुरेपूर वापर होत नाही. त्यासाठी कौशल्य विकास व त्यातून अर्थाजन यावर संस्था काम करत आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. दीपक मडावी यांनी अत्यंत कमी वयात हे शिधनुष्य पेलले आहे.त्यांचे मी अभिनंदन करतो तसेच आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. आपण त्यांचा लाभ घ्यावा” “ग्रामीण भागातुन अत्यंत मोठे उद्योजक,संशोधक, अधिकारी झाले आहे त्यामुळे निराश न होता मेहनती आणि जिद्दी च्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकता” असे सांगितले.

कार्यक्रमात मंचावर प्रामुख्याने मा.रवींद्रजी ठाकरे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास नागपूर,मा.सौ.स्वाती सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी वर्धा,मा.दीपकजी भेंडे माजी न्यायाधीश, मा. महादेवजी मडावी,संतोषजी मडावी, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य श्री.सतीश सिडाम यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी सर्वश्री उमेश सावलकर,दिलीपजी येडमे, धनराज उईके,अविनाश उईके,दीपक इरपतकर,रवी कुरसुंगे,प्रफुल्ल कवरती व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले.

Leave a Comment