आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर*यांच्या विशेष प्रयत्नाने गावातील मंदीर परिसरात “2515 अंतर्गत 5 लक्ष रुपये मंजूर” केलेल्या पेव्हर ब्लॉक कामांचे भूमिपूजन

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर.

आज दि२८ रोजी वैजापूर ग्रामीण १ येथे गावातील मंदीर परिसरात “2515 अंतर्गत 5 लक्ष रुपये मंजूर” केलेल्या पेव्हर ब्लॉक कामांचे भूमिपूजन आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच ग्रामपंचायतच्या वतीने #आमदार_साहेबांच्या हस्ते टेबल फैन वाटप करण्यात आले.
.
यावेळी मुख्यमंत्री_श्री_उद्धवजी_ठाकरे_साहेबयांची संकल्पना “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी..” ही मोहीम आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरयांनी तालुक्यात सुरू केली आहे.
मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्रत्येक शिवसैनिकांनी गावातील प्रत्येक कूटुंब हे माझे कूटुंब आहे व ती माझी जबाबदारी आहे असे समजावे. यासाठी सर्वांनी नेहमी “मास्क वापरणे, सनिटायझरचा वापर करणे, साबणाने हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वयोवृद्धानी घराबाहेर पडू नये” या नियमांचे नेहमी पालन करावे. तसेच प्रत्येक गावातील सरपंचानी देखील आपल गाव आपल कुटुंब समजावे व गावांची कळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या. असे आमदार साहेबांनी या मोहीमेतुन सांगितले.
होय ही लढाई आपण लढणार आणि जिंकणारच!
.
.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, तालुका प्रमुख सचिन वाणी, सजनराव गायकवाड, दौलतभाऊ गायकवाड, प्रविण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी उपस्थीत होते.

Leave a Comment