इंस्टाग्रामची आयडी मागुन एका महाविद्यालयीन अल्पवयीन विध्यार्थीनीचा विद्यार्थ्यांने केला विनयभंग

0
281

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महाविद्यालयीन अल्पवयीन विध्यार्थीनी वर्गात बसलेली असतांना एका विध्यार्थ्याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे बोलल्याने पिडीत विध्यार्थीनीने येथील पोलीस ठाण्यात त्याचे विरूध्द तक्रार दिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलीस सुत्राने दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन विध्यार्थीनी येथील एका महाविद्यालयात शिकत आहे. दिनांक १२सप्टेबर मंगळवार रोजी विध्यार्थीनी ही आपल्या मैत्रीनी सोबत वर्गात बसलेली असतांना त्याच महाविद्यालयातील एक विध्यार्थी तीचे जवळ येवून तिला तु इंस्टाग्रामवर रील्स बनवते का? तुझा इंस्टाग्रामची आयडी दे अशी मागणी केली असता विध्यार्थीनीने त्याला मी इंस्टाग्राम वापरत नसल्याचे सांगितले .

यावेळी विध्यार्थ्याने लज्जा उत्पन्न होईल असे बोलला असता तेव्हा विध्यार्थीनीने आपण महाविद्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटल्यावर तीला तुला महाविद्यालय ईमारती वरून खाली टाकण्याची धमकी दिली आहे.

पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here