Home पर्यावरण एक महिना उलटूनही जळगाव ते जामोद रोडच्या तक्रारीवर सुस्तावलेल्या सार्वजनिक बांधकामविभाग यांचेकडून...

एक महिना उलटूनही जळगाव ते जामोद रोडच्या तक्रारीवर सुस्तावलेल्या सार्वजनिक बांधकामविभाग यांचेकडून कोणतीच दखल नाही

411
0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव ते जामोद या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून चालू होते या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता तसेच भ्रष्टाचार बोळकावल्याने या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच हे काम करताना ठेकेदाराने व बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू होते यामध्ये जळगाव ते सुनगाव या सहा किमी रोडचे काम हे आता तीन महिने अगोदर झालेले आहे हे जळगाव ते सुनगाव रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्यावरील अंथरलेले डांबर चे कोटिंग पूर्णता उखडून गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे ज्यावेळेस ह्या रोड चे काम चालू होते त्यावेळी गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी या निकृष्ट दर्जाच्या रोजच्या कामाला विरोध केला होता परंतु ठेकेदार व अधिकारी यांनी त्यांचा विरोध झुगारून रोडचे काम सुरू ठेवले होते याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी या रोडच्या कामातील काही मोठी रक्कम कमिशन स्वरूपात घेतल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच या रोडवर कोणत्याच अधिकाऱ्यांचे नियंत्रण नव्हते त्यामुळे हा रोड अवघ्या तीनच महिन्यात पडलेला आपणास दिसत आहे गावातील काही सुज्ञ नागरिकांनी याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिनांक आठ सप्टेंबरला रोडचे काम करणारे अधिकारी व ठेकेदार यांच्या तक्रारीचे सुद्धा निवेदन दिले आहे निवेदनामध्ये सुनगाव ते जळगाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गेल्या तीन महिने अगोदरच झाले आहे व पहिल्या पावसामध्ये या रोडवरील पुर्ण उघडुन रोडच्या साईडला पडलेली आहे व जागोजागी या रोडच्या खड्डे सुद्धा पडले आहेत सदर रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाच्या बनविल्याने रोडची दयनीय अवस्था बघायला मिळत आहे तसेच रोडवरील निघालेल्या गिट्टिमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे तरी निवेदनाद्वारे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची आमच्या समक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई व पुन्हा या रोडची दुरुस्ती करण्यात यावी व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांना देण्यात आले आहे परंतु आज तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतरही सुस्तावलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे या विभागाचे व संबंधित ठेकेदाराचे सदर रोडबाबत काहीतरी साटेलोटे असल्याचे उघडकीस येत आहे

Previous articleसंग्रामपूर शहरात भगत प्लास्टिक यांचे कंत्राट सुरळीत चालू ठेवा -600 नागरीकांनी सह्या करून दिले मुख्याधिकारी यांना निवेदन
Next articleशेतकऱ्यांचे तहसीलदार यांचेमार्फत पालकमंत्री यांना निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here