दि 24 ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा लागू व्हावे यासाठी राज्यभर ओबीसी समाजातील संघटनेचा व ओबीसी नेत्यांचा संघर्ष चालूच होता ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले होते. समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात होते काही निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला संधी मिळत नव्हती ओबीसी समाजाचा राज्यभर मोठमोठाले आंदोलन, मोठमोठे मोर्चे ,मोठ मोठाले रस्ता रोको, करून सुद्धा या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी व न्याय मिळवण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी निवेदन ओबीसी नेते करत होते. परंतु या समाजाकडे दुर्लक्ष केले जात होते.
राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर शिंदे- फडवणीस सरकारने काटेकोर पणे या ओबीसी समाजाकडे लक्ष देण्याचे काम केले व ओबीसी समाजाला न्याय मिळवण्यासाठी लक्ष दिले.
आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर प्रकाश भैय्या सोनसळे ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाला आरक्षण मंजूर झाल्याबद्दल प्रकाश भैय्या सोनसळे यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यामध्ये सर्व समाज बांधव नेते कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन आनंद साजरा करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेऊन ओबीसी समाजाला न्याय दिला या निर्णयाचा धनगर समाजाचे नेते प्रकाश भैय्या सोनसळे यांनी शिंदे व फडणवीस सरकारचे अभिनंदन केले व असेच सहकार्य असेच प्रेम व धनगर आरक्षणाचा लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यांना निवेदन देणार आहे असेही प्रकाश भैया सोनसळे यांनी म्हटले आहे.
यावेळी हनुमंतरावजी काळे साहेब, नारायणजी भोंडवे सरपंच, भारत गाडे, ओंकार काळे, कैलास पांढरे ,अशोकराव पांढरे, शुभम भोंडवे सुदर्शन दादा भोंडवे , माऊली मारकड,मारकड ताई ,रोहन काळे, सरपंच बंगाल, आण्णा निर्मळ, प्रमोद गाडे,निलेश अडाले,पाराजी अडाले,मारकड भैय्या,हानुमंत राहींज, भोंडवे भैय्या आदी उपस्थित होते