कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा जीवे मारण्याची धमकी वाळू तस्करांच्या मुसक्या केव्हा आणि कोण अवळणार ?

 

विकी वानखेडे यावल

यावल तालुक्यातील शिरसाड गावाजवळ वाळुची विनापरवाना वाहतुक करणार्‍यांकडून महीला पर्यवेक्षकास  मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे. तालुक्यातील विनापरवाना वाळुची वाहतुक करणार्‍यांची मुजोरी वाढली असुन महसुलच्या अधिकार्‍यांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे.

वढोदे ता.यावल ते शिरसाड रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतुक करणार्‍यांनी पर्यवेक्षक म्हणुन नेमणुकीस असलेल्या महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांना कर्तव्यावर असतांना धक्काबुकी व शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी पोलीसात त्या अज्ञात वाळु वाहतुक करणार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, बामणोद तालुका यावल येथे बबीता सुधाकर चौधरी या मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. दिनांक ३१ ऑगस्ट रोजी त्यांचेकडे महसुल प्रशासनाच्या वतीने थोरगव्हाण तालुका यावल करीता पर्यवेक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली असुन .

आज दिनांक ३१ ऑगस्ट गुरूवार रोजी दुपारी १२ , १५ वाजेच्या सुमारास पर्यवेक्षक बबीता चौधरी या आपल्या कडील खाजगी वाहनाने थोरगव्हाण कडे जात असतांना वढोदे प्रगणे यावल ते शिरसाड या रस्त्यावर वढोदे गावाजवळ विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर वाळु वाहतुक करीत असतांना आढळुन आले.

संबधीत ट्रॅक्टर चालकाकडे बबीता चौधरी यांनी वाळु वाहतुकीचा परवाना मागीतला असता परवाना नसल्याचे सांगुन थोरगव्हाण च्या पर्यवेक्षक आणी बामणोदच्या महिला मंडळ अधिकारी असलेल्या सौ बबीता सुधाकर चौधरी यांच्याशी ट्रॅक्टरचालक निलेश समाधान सोनवणे याने हुज्जत घातली व धक्काबुकी करीत करून शिविगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

दरम्यान संबधित ट्रॅक्टर वाहन चालकाने घटनास्थळा वरून निलेश सोनवणे राहणार थोरगव्हाण तालुका यावल व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने ट्रॅक्टर पळवुन नेले. या प्रकरणी मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment