कांदा निर्यात बंदी हटवा व सोयाबीन पिक वीमा मंजूर व्हावा यासाठी प्रसेनजीतदादा विचारमंच च्या वतीने निवेदन देण्यात आले

 

जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन कोरोनाच्या संकट काळात आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. प्रसेनजीतदादा विचारमंच च्या शेतकरी विरोधी धोरणाचा व केंद्र शासनाचा निषेध करून कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवन्यात यावी तसेच चालू हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकासन झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचा पिक वीमा तात्काळ मंजूर करण्यात यावा या मागण्यांचे निवेदन मा.पंतप्रधान भारत सरकार, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी बाळु पाटिल डिवरे, संजय देशमुख,रेहमत ट्रांसपोर्टवाले, ईमरान खान, अजहर देशमुख,मोहसीन खान, आशिष वायझोड़े, ईरफान खान, पंजाब वाघ, सिद्धू हेलोडे,निज़ाम राज,मोहजीर मौलाना,सतिश तायड़े,भागवत अवचार,निजाम सर,सैय्यद नफिज़, सुरेश पाचपोर,आकाश जाने, सतिश डोंगरदिवे,ताहेर माही, साजिद,फाट्यासिंग पावरा, गरीबसीमा पावरा,गज्यासिंग पावरा, रेहान शाहा, खुमसिंग पावरा सह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Comment