Home Breaking News किनगाव येथील त्या महीलेवर चाकुहल्ला करणाऱ्यानी व्यक्तिने त्याच शेतातील विहीरीत केली आत्महत्या

किनगाव येथील त्या महीलेवर चाकुहल्ला करणाऱ्यानी व्यक्तिने त्याच शेतातील विहीरीत केली आत्महत्या

641
0

 

 

यावल तालुक्यातील किनगाव येथे एका व्याक्तिने शेतात काम करणाऱ्या महीलेवर चाकुहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असता आज त्या घटनेतील चाकुहल्ला करणाऱ्याने विहीरीत आत्महत्या च्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की काल दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या एका २८ वर्षीय महीलेवर चाकुनेवार करून गंभीर जख्मी करून घटनास्थळावरून निघुन गेल्याची घटना घडती होती .आज मात्र या संपुर्ण घटनेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असुन, यात महीलेवर हल्ला करणारा चंद्रकांत वसंत खलसे वय४५ वर्ष या शेतमजुरी करणाऱ्याने त्याच हनुमागडी आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतातील विहीर उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत हल्ला केल्यानंतर सदर चंद्रकांत खलसे हा आपण आता आत्महत्या करणार असुन माझ्या मजुरीचे तिनहजार रुपये हे माझ्या वयोवृद्ध आईला द्यावे असे तो सांगुन घटनास्थळावरून निघुन गेला ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले त्यांनी त्याच्या बोलण्यास गांर्भीयाने घेतले नाहीत . दरम्यान आज सकाळी दिनांक २६ जानेवारी रोजी मजुर शेतात कामास गेले असता सदरच्या चाकु हल्यातील चंद्रकांत खलसे यांचा मृतदेह हे विहीरीत आढळुन आले असुन , पोलीस या घटनेच्या स्थळी पंचनामा करण्यासाठी रवाना झाले असल्याचे वृत्त आहे . चंद्रकांत खलसे हा४५ वर्षीय व्यक्ति आपल्या वयोवृद्ध आई बरोबर किनगाव गावात राहात होता .

Previous articleयावल शहरातील स्वस्त धान्य दुकानात केली अज्ञात चोरटयांनी धान्याची चोरी पोलीसात गुन्हा दाखल
Next articleकृषी कायद्याच्या विरोधात संग्रामपुर तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मार्च धडकला…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here