किरकोळ सामान आणायचा आहे असे सांगून शेगाव बस स्थानक येथून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता, शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

भाची सोबत शेगाव बस स्टैंड वर आलेल्या 19 वर्षीय तरुणी किरकोळ सामान आनायला जाते असे सांगून निघून गेली ती बराच वेळ पर्यंत आली नाही त्यामुळे सदर माहिती तरुणीच्या भावांना देण्यात आली.

त्यावरून तरुणीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये हरविल्याची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गवई बकल नंबर 715 करीत आहेत

 

🔹

Leave a Comment