Home बुलढाणा Accident-news/भरधाव दुचाकीच्या धडकेने ६३ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू ,

Accident-news/भरधाव दुचाकीच्या धडकेने ६३ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू ,

 

संग्रामपूर (सूर्या मराठी ब्युरो)ः- शहरातीला स्टेट बँक ऑफ इंडिया जवळील योगी मेडिकल स्टोअर समोर रोड पार करीत असतांना दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,

याबाबत प्राप्त माहिती अशी कि तालुक्यातील पळशी (झाशी) येथील सुरेश सिताराम हिरोळकर वय ६३ वर्षे हे दि ११/ सप्टेंबर योगी मेडिकल स्टोअर्स मधून औषध घेऊन स्टेट बँक समोरील रोड पार करीत असतांना अज्ञात दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिली त्यात ते गंभीरपणे झाले असता त्यांच्यावर दवाखान्यात उपचार करत असतांना त्यांची प्राणज्योत मावळली ,याबाबत त्यांचा मुलगा अक्षय सुरेश हिरोळकर रा, पळशी (झाशी) यांनी दि, /१४/ सप्टेंबर रोजी तामगाव पो.स्टे.ला फिर्याद दाखल केली.apghatnews

 

त्यावरून अज्ञात दुचाकी स्वारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात दुचाकी स्वाराचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास तामगाव पो.स्टे.चे पोलीस करीत आहेत.

Accidentnews/सदर ठिकाणचे सिसी टीव्ही कॕमेरे पोलीसांनी तपासणी केली तर निश्चितच दुचाकी स्वार सापडेल .अशी मयत कुटुंबाची मागणी आहे.