किसान सेनेच्या निवेदनाची दखल सग्रामपूर ते बोडखा रस्त्यावरील झाडे झुडपे काढण्यास सुरुवात

 

संग्रामपूर प्रतिनिधी/७ जानेवारी

तालुक्यातील संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावर दोन्ही बाजूने काटेरी झुडपे वाढलेली होती त्यामुळे वाहन चालकांना तसेच या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना या काटेरी झळाझुडपांचा त्रास होत होता या बाबीची ची दखल घेत कर्तव्यदक्ष किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी तहसीलदारांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचे निवेदन दिले होते त्यामुळे या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ जानेवारी रोजी संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे जेसीबीच्या साह्याने काढण्यास सुरुवात केली आहे

संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावरील झाडे झुडपे काढण्यात यावी या मागणीसाठी 21 डिसेंबर रोजी तहसीलदार यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना निवेदन दिले होते सदर दिल्या निवेदनात नमूद होते की संग्रामपूर ते बोडखा हा अंदाजे तीन ते चार किमी चा रस्ता असून या रस्त्यावर मोठ-मोठी काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत तसेच रस्त्यावरील वळणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत.त्यामुळे या वाढलेल्या झुडपांमुळे दुचाकी व चारचाकी वाहने तसेच वाहनावरील चालकांना समोरून कोणते वाहन येत आहे हे दिसत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा अपघात होतो. तसेच बराच वेळा या वळण रस्त्यावर काटेरी झाडे झुडपे वाढल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. तसेच वांधारकांना रात्रीच्या वेळी अंधारात या काटेरी झाडाझुडपांचा आपले वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता .त्यामुळे रस्त्यावर असलेले झाडे झुडपे त्वरित काढण्यात यावी अन्यथा संग्रामपूर तालुका किसान सेनेच्या वतीने आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आला होता या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संग्रामपूर ते बोडखा रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे काढण्यास सुरुवात केली आहे
हे काटेरी झाडे झुडपे, काढण्यात यावी या मागणीसाठी किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांनाही याबाबतची माहिती दिली होती त्यामुळे जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने यांनी व किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी या गंभीर बाबीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला .त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबीची दखल घेत 7 जानेवारी रोजी या रस्त्यावरील झाडे झुडपे काढण्यास सुरुवात केली आहे
या मागणीसाठी शुभम घाटे शहर प्रमुख विजय मारोडे उप .ता .प्रमुख ,मुरली इंगळे, राहुल मेटांगे, सुनील मुकुंद, धनंजय आवचार, शेख अब्दुल शेख लुकमान, अमोल देशमुख, नितीन भिसे, विशाल बकाल, प्रकाश थोरात आदी शिवसैनिकांनी बोडखा ते संग्रामपूर रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे काढल्यामुळे परिसरातील नागरिक किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांचे आभार मानत आहे

बातमीत फोटो कॅप्शन
रस्त्यावरील झाडे झुडपे काढताना जेसीबी तसेच किसान सेनेचे अमोल ठाकरे

Leave a Comment