Home Breaking News कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला सर्वांनी अभिवादन का करावे?

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला सर्वांनी अभिवादन का करावे?

266
0

 

अजहर शाह मोताळा तालुका प्रतिनिधी

मोताळा:- छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुघलांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी संस्कृतवरती प्रभुत्व मिळविल्यामुळे औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले !

पहिल्या बाजीराव पेशवेव्याने गुजरात जिंकणाऱ्या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी आळंदीजवळ बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले. त्यांच्या मुलाला द्वेषापोटी दगाबाजीने मारले !

तिसऱ्या पानिपताच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तर पेशवे यज्ञ, याग, होम हवन, भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते. भोजनाचे वेळी पेशवे हे जाधवराव, निंबाळकर, घोरपडे, शिंदे, होळकर, भोसले, पवार, जगदाळे इत्यादी मराठा सरदारांनादेखील पंक्तीला घेत नसत, शिवाजीराजानी कधीही भेदभाव केला नाही. पेशव्यानी अनैतिकतेचा कळस गाठला होता. अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तेंव्हा पेशवे जप तप आणि भोजनाचे नियोजन करत होते. म्हणजे सदाशिव पेशव्याने एक लाख मराठयांना अब्दालीच्या समोर नेवून बळी दिले, तेंव्हा महाराणी ताराराणी म्हणाल्या “बरं झालं पेशवाई बुडाली”. पानिपतात पेशव्यांच्या पराभवाचा महाराणी ताराराणीला आनंद झाला, इतका पेशव्याबद्धल महाराष्ट्रात रोष निर्माण झाला होता !

छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा गादीचे वंशज पहिले छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लहान वयात गादीवरती आले, तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा बाल छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, म्हणून त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली !

छत्रपती घराणे त्यांना चोरून शिकवेल म्हणून पेशव्यांनी सातारच्या राजवाड्या भोवती गुप्तहेर नेमले, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई रात्री अडीच वाजता चोरून शिकवायची. छत्रपतींची ही अवस्था तर सामान्य रयतेचे पेशव्यांनी काय हाल केले असतील…?
याची कल्पना करा !

पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी सातारा येथून पुण्याकडे सैन्य घेऊन निघालेल्या छत्रपती चतुरसिंग भोसले यांना दगाबाजीने पकडून दुसऱ्या बाजीरावाने कोकणातील कांगोरी किल्ल्यात डांबून छत्रपती चतुरसिंगांना हाल-हाल करून ठार मारले !

अमृतराव पेशवेव्याने खंडणी न देणाऱ्या शेतकऱ्यांना तापलेल्या तव्यावर उभे करून छळले, तर शेतकऱ्यांच्या लहान मुलांच्या बेंबीत आणि कानात तोफेची दारू भरून त्याला अग्नी द्यायचा, त्यामुळे मुलांचे डोके आणि पोट फुटायचे, इसिस, तालिबानी, नक्षली, सनातनी जसे निरपराध लोकांना निर्दयपाने मारतात, तसेच पेशवेदेखील निरपराध प्रजेला निर्दयपणे मारत असत !

इंदूरच्या विठोजी होळकर यांना पुण्यात हत्तीच्या पायाला बांधून पेशव्यांनी हालहाल करून ठार मारले. पेशवेकाळात अस्पृश्यांना तर माणूस म्हणून जगायचा अधिकार नव्हता. त्यांचा प्रचंड छळ झाला. कंबरेला केरसुणी आणि गळ्यात मडके अशी अस्पृश्याची अवस्था होती !

युद्ध-वास्तव

पेशव्यांनी सर्वाधिक छळ ब्राह्मण महिलांचा केला, महिलांचा जन्म जणू कांही उपभोग घेण्यासाठीच आहे, अशी महिलांची स्थिती पेशवाईत होती. त्या छळाचे या ठिकाणी वर्णन करणे देखील उचित ठरणार नाही !

छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, महिलांचा सन्मान करणाऱ्या शासन व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम पेशव्यांनी केले, त्यामुळेच 500 शूरवीर मावळ्यांनी 300 ब्रिटिशांच्या मदतीने 28 हजार पेशव्यांचा पराभव केला. त्या 500 शूरवीरामध्ये मराठा, महार, मुस्लिम, राजपूत, मातंग धनगर, इत्यादी मावळे होते !

मराठा-महार-मुस्लिम खांद्याला खांदा लावून भावाप्रमाणे पेशवाई विरोधात लढले. त्यांची यादी पेरणे कोरेगाव – भीमा येथील विजयस्तंभावरती आहे. त्या 500 सैनिकांपैकी खंडोजी माळवदकर हे एक शूर मराठा वीर होते. त्यांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून जमीन इनाम दिली, त्यांच्या शेतालगतच हा विजयस्तंभ आहे !

500 मावळ्यांनी 300 ब्रिटीशांची मदत घेतली किंबहुना ब्रिटिश आणि पाचशे मावळे एकत्र येऊन पेशव्याविरुद्ध लढले, म्हणून त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही, कारण 1818 साली देश, राष्ट्र ही संकल्पना नव्हती, त्या काळात विविध संस्थाने होती. देश, राष्ट्र ही संकल्पना 1947- 1950 नंतर आली !

500 मावळ्यांना देशद्रोही ठरविणार्‍यांनी टिपू सुलतानविरुद्ध इंग्रजांना मदत करणाऱ्या पेशव्याबद्दल आपले मत स्पष्ट करावे, तसेच पेशव्यांनी 1802 साली इंग्रजाबरोबर वसईचा तह केला होता व इंग्रजांची तैनाती फौज पदरी बाळगली होती !

छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद करण्यासाठी इंग्रजांना मदत करणाऱ्या व शनिवारवाड्यावरचा जरीपटका खाली उतरवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकविनाऱ्यानी राष्ट्रवादाच्या व देशप्रेमाच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे !

ज्यावेळेस कोरेगाव भीमा येथे युद्ध सुरू होते, तेंव्हा शिवाजीराजांचे अत्यंत तरुण वंशज छत्रपती प्रतापसिंह महाराज व राजपरिवाराला दुसऱ्या बाजीराव पेशव्याने वासोटा किल्यावर नजरकैदेत अर्थात कैदेत ठेवले होते. छत्रपतींना कैदेत टाकणाऱ्या पेशव्याना पराभूत करून त्या पाचशे शुरावीरांनी खरे तर छत्रपतींच्या अपमानाचा बदलाच घेतला. पेशव्यांचा पराभव झाल्यानंतरच प्रतापसिंह महाराजांची सुटका झाली !

एवढे मात्र नक्की की शिवरायांचे पाचशे मावळे जुलमी पेशवाई विरुद्ध खांद्याला खांदा लावून 1 जानेवारी 1818 रोजी लढले व शिवस्वराज्याची वाताहात लावणाऱ्या पेशव्यांना धडा शिकवला, त्यांचा तमाम मराठा, बौद्ध,ओबीसी,एससी,मुस्लिम यांना अभिमान वाटायला हवा !

जुलमी पेशव्याविरुद्ध त्यांनी गाजवलेल्या शौर्यामुळे इंग्रजानी पेरणे येथे विजयस्तंभ उभारला. त्यामुळे तमाम बहुजन समाजाला त्या विजय स्तंभा बद्धल अभिमान वाटायला हवा !

त्यामुळे आम्ही 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहोत !

आपल्या पूर्वजानी एकोपा जपला, आपणही एकोपा जपूया !

संदर्भग्रंथ-

1)छत्रपती शिवाजी महाराज-वा सी बेंद्रे
2)छत्रपती संभाजी महाराज-वा सी बेंद्रे
3)नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे-शरद पाटील
4)पानिपत 1761-त्र्यंबक शेजवलकर
5)सातारच्या राज्यक्रान्तिचा इतिहास-प्रबोधनकार ठाकरे
6)दाभाडे घराण्याचा इतिहास-परांडकर
7)महात्मा फुले -धनंजय कीर

Previous articleउपविभागीय अधिकाऱ्यांना वरली मटका सुरू करण्याची केली मागणी
Next articleमलकापूर पांग्रा जवळ कंटेनरचा अपघात सुदैवाने जीवित हानी टळली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here