शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे
शेगाव तालुक्यात आता ऑनलाईन शिकवणी
गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांचे आदेश
शेगाव :शाळा बंद असल्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षकांना नियमीतपणे वर्गात फळयावर शिकवून त्याचे ऑनलाईन मोवाईलव्दारे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारण करण्याच्या सुचना गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा यांचे आदेश क्रमांक गृहविभाग कक्ष -4-2- कावि/13/2022 दिनांक 9/1/2022 नुसार वाढत्या कोविड प्रार्दुभावामुळे तालुक्या अंतर्गत सर्व शाळा दिनांक 10/1/22 पासुन विद्यार्थ्याकरीता बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिकवणी नियमित सुरू ठेवण्याचे दृष्टीने सुचना करण्यात आली आहे.
तरी सर्व पालकानी आपले पाल्यास मोवाईलची सुवीधा उपलब्ध करुन दयावी. मोबाईलची सुवीधा उपलब्ध होत नसल्यास ज्यांचेकडे मोवाईल उपलब्ध आहे अश्याठिकाणी कोवीड नियमाचे पालन करुन, दोन किंवा तिन पाल्यास एकत्र वसवून तशा प्रकारे ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.विद्यार्थी व पालक यांचेसुध्दा सहकार्य अपेक्षीत आहे.असेही आवाहन पं स चे गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांनी केले आहे.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



