सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
कोरोना च्या संकट काळामध्ये लोक भयभीत झालेले असताना सिंदखेडराजा तालुक्यातील सावंगी भगत या छोट्याशा गावांमध्ये डेंग्यूचा रुग्ण परत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ‘अगोदरही सांवंगी भगत गावामध्ये चार ते पाच डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते .त्यानंतर आरोग्य विभाग साखरखेडा यांच्या वतीने दोन तीन वेळेस घराची ची फवारणी सुद्धा करण्यात आली होती,परंतु परत प्रवीण चंद्रकांत गवई यांचा लहान मुलाला ताप येऊ लागल्यामुळे त्यांनी तातडीने चिखली येथील खासगी दवाखान्यांमध्ये मुलाला भरती केले .त्यानंतर मुलाचे रक्त लघवी चे नमुने तपासले असता ,मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला व त्याला डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले ! सावंगी भगत गावची लोकसंख्या जेमतेम दोनशे ते तीनशे आहे,मोलमजुरी करून पोट भरणारे मजूरवर्ग येथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे,अशातच डेंग्यूच्या साथीमुळे सावंगी भगत पालक वर्ग भयभीत झाला आहे,गावामध्ये आरोग्य विभागाने कठोर पावले उचलण्याची मागणी यावेळी पालक प्रविण चंद्रकांत गवई यांनी केली आहे ‘ -तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांच्याशी संपर्क साधला असता .त्यांनी आपण तातडीने उपाययोजना करू व तसे काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिले आहे असे सांगितले ‘


![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=218%2C150&ssl=1)




