कोविड लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे – जिल्हाधिकारी कोरोना लसीकरण तयारीसाठी जिल्हास्तरीय बैठक

 

सर्व खाजगी डॉक्टर, स्टाफ यांची नोंदणीक करावी
निवडणूकीच्या धर्तीवर

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

राहणार लसीकरण कार्यक्रम
बुलडाणा दि.29 : कोविड या साथरोगाच्या नियंत्रणासाठी लवकरच लसीकरण देशात सुरू होणार आहे. याबाबत राष्ट्रीय व राज्य पातळीवर नियमित तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राहणार आहे. तरी या लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद मुजील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद यांनी सादरीकरण केले. सादरीकरणावेळी ते म्हणाले, लसीकरण टप्पेनिहाय करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम हेल्थ वर्करमध्ये डॉक्टर, नर्सेस, सर्व खाजगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यामध्ये कोविड कालावधीत काम केलेले पोलीस अधिकारी – कर्मचारी, महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व लोक, त्यानंतर चौथ्या टप्प्यात 50 वर्षाच्या आतील दुर्धर आजार असलेले नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. मात्र लसीकरणासाठी को विन ॲपवर नोंदणी आवश्यक आहे. सर्व खाजगी डॉक्टर, नर्सेस त्यांचा स्टाफ, यंत्रणेतील हेल्थ वर्कर, पोलीस, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता यांची नोंदणी करावी. नोंदणीसाठी महसूल यंत्रणेने पुढाकार घ्यावा. आपआपल्या तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरची नोंदणी होईल, याची काळजी घ्यावी.
तसेच लसीकरण स्थळ हे तीन भागात असावे. यामध्ये पहिल्या भागात प्रतीक्षा खोली, दुसऱ्या भागात प्रत्यक्ष लसीकरण खोली, तर तिसऱ्या भागात निरीक्षण खोली असणार आहे. निरीक्षण खोलीमध्ये 30 मिनीटापर्यंत लसीकरण केलेल्या व्यकतीला ठेवण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर तारिख, स्थळ व वेळेचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे. एसएमएस दाखविल्यानंतर लसीकरण बुथमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. याठिकाणी ओळखपत्र तपासण्यात आल्यानंतर लसीकरणासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या डोससाठी एसएमस पाठविण्यात येणार आहे. लसीकरणानंतर एसएमएसमध्ये एक लिंक येणार असून त्यामधून प्रमाणपत्र जनरेट होणार आहे. प्रत्येक लसीकरण स्थळ लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर सॅनीटाईज करण्यात येणार आहे. लसीकरण स्थळ हे समाज मंदीर, शाळा, मंगल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, एखादी खाजगी जागा असणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. लस ही इंजेक्टीबल असून डिस्पोजेबल सिरींजची असणार आहे. ही सिरींज एकावेळी एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे. तसेच लसीकरण स्थळामध्ये कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सोशल डिस्टसिंगचे कडक पालन करण्यासाठी त्यापद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच लसीकरणानंतर वेस्ट मॅनेजमेंटचीही व्यवस्था असणार आहे. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिक्षक, संबंधीत यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment