सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
सध्या संपूर्ण देशामध्ये covid-19 लसीकरणाचा डोस देण्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे काही ठिकाणी तयारी पूर्ण देखील झालेली आहे !अशातच राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा तालुका कोविड शिल्ड लसीकरणासाठी सज्ज झाला आहे !याबाबत तालुका आरोग्य अधिकारी श्री महेंद्र साळवे यांनी सांगितले आहे की ‘अगोदर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत ट्रेनिंग देण्यात आली आहे ‘शिवाय संपूर्ण शासकीय कर्मचारी तसेच खाजगी आरोग्य कर्मचारी .डॉक्टर यांची माहिती संकलन करून ते बुलढाणा येथे पाठवण्यात आली आहे ।यामध्ये तालुक्याच्या दृष्टीने समिती नेमण्यात आली असून यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी ।तहसीलदार व उपविभागीय अधिकारी ‘बिडिओ ।उपविभागीय पोलिस अधिकारी ‘पोलीस अधिकारी ‘ आधी कर्मचारी चा यात समावेश आहे ।ही कमिटी दर आठवड्याला बैठकीचे आयोजन करत असूनया मध्ये लसीकरणाबाबत उपाय योजना केल्या जातात ‘लसीकरणाबाबत तीन खोल्या उपलब्ध केल्या असून ह्या मध्ये वेटिंग रूम ‘यामध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून आरोग्य कर्मचारी हे शासकीय अवतेच आहेत की नाही यासाठी पोलीस त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना आत मध्ये प्रवेश देतील ‘यामध्ये सदर व्यक्ती तंदुरुस्त आहे की नाही याची तपासणी करून त्यानंतर त्यांची नोंद करण्यात येईल !दुसरी खोली आहे ‘ ‘कोविड शिल्ड लसीकरणाची ‘यामध्ये ज्या कर्मचाऱ्याची नोंद केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना या रूममध्ये नेऊन त्यांना लस देण्यात येईल ।लस दिल्यानंतर तीन नंबरची खोली असेल ती । .प्रतीक्षालय !यामध्ये व्यक्तीला लसी चे इंजेक्शन दिल्यानंतर त्या खोलीमध्ये अर्धा तास बसवण्यात येईल ।त्याला कुठल्या प्रकारचे त्रास जाणवत असेल तर त्याला आय एफ आय ची किट उपलब्ध असेल व त्यानुसार त्याच्यावर इलाज करण्यात येईल !अशी व्यवस्था तीन खोल्यांमध्ये करण्यात आली आहे !अगोदर लस ही आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येणार असून त्यानंतर शिक्षक ‘ पोलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल ‘व त्यानंतर ज्यांचे वय पन्नास वर्षे वरील आहेत अशांना सर्व तपासणी करून लक्ष देण्यात येईल !अशी माहिती सिंदखेडराजा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी श्री महेंद्र साळवे यांनी दैनिक लोकमंथन ला बोलताना दिली !